Name Astrology for Boys: ज्योतिषाच्या राशीप्रमाणे, ज्योतिषशास्त्रातील नावाच्या पहिल्या अक्षरावरून एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घेता येते. यानुसार जर एखाद्या मुलाचे नाव काही ठराविक अक्षरांनी सुरू होत असेल तर तो एका विशेष व्यक्तिमत्त्वाचा मालक असतो आणि मुली त्याच्याकडे सहज आकर्षित होतात. असे म्हणले जाते की या विशिष्ट अक्षरांनी नावं सुरु होणाऱ्या मुलांमध्ये मुली आपला जोडीदार शोधू इच्छितात. चला जाणून घेऊया कोणत्या अक्षरांनी नावं सुरु होणाऱ्या मुलांसंदर्भात असं म्हटलं जातं ते…

मुलींना ही मुले आवडतात

ज्यांचे नाव A अक्षराने सुरू होते: ज्योतिषशास्त्रानुसार ज्या मुलांचे नाव इंग्रजीतील A अक्षराने सुरू होते ते स्वभावाने खूप रोमँटिक असतात. ही मुले देखील आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात. मुलींना ही मुले खूप आवडतात.

आणखी वाचा : गुरू ग्रहाने वक्री होत बनवला धन राजयोग, या ३ राशींना धनलाभ आणि प्रगतीची दाट शक्यता

ज्या मुलांचे नाव D अक्षराने सुरू होते: ज्या मुलांचे नाव D अक्षराने सुरू होते ते अंतःकरणाने शुद्ध असतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक विशेष प्रकारची मोहिनी असते. ही मुले आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करतात आणि त्याच्यावर खूप प्रेम करतात.

ज्या मुलांचे नाव N अक्षराने सुरू होते: ज्या मुलांचे नाव N ने सुरू होते ते स्वभावाने साधे असतात आणि कोणाचेही मन सहज आकर्षित करू शकतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या जोडीदारासोबत उभं राहण्याचा वेगळेपणा त्यांना इतरांपेक्षा खास ठरवतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या मुलांचे नाव P अक्षराने सुरू होते: ज्या मुलांचे नाव P अक्षराने सुरू होते, त्यांची विनोदबुद्धी अद्भुत असते. त्यांच्या बोलण्यावर मुली फिदा होतात. आपल्या जोडीदाराला खूश ठेवण्यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत.