Navpancham Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीला सर्वांत कठोर ग्रह मानले जाते. कारण- तो माणसांना त्यांच्या कर्मांनुसार फळ देतो. शनी हा फार हळू चालणारा ग्रह आहे, जो एका राशीत सुमारे अडीच वर्षे थांबतो.
सध्या शनी गुरूच्या मीन राशीत आहे आणि तिथे तो २०२७ सालापर्यंत राहणार आहे. त्यामुळे शनीचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान जुलै महिन्याच्या शेवटी शनी कर्क राशीत असलेल्या सूर्याशी संयोग करून नवपंचम राजयोग तयार करणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. चला तर मग पाहूया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, २४ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजून ५१ मिनिटांनी सूर्य आणि शनी एकमेकांपासून १२० अंशाच्या अंतरावर असतील, ज्यामुळे नवपंचम राजयोग तयार होत आहे. शनी सध्या मीन राशीत वक्री अवस्थेत असतील.
मेष (Aries)
या राशीवर सध्या शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा चालू आहे; पण शनी वक्री अवस्थेत असून सूर्याशी नवपंचम राजयोग तयार होत असल्याने या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत फायदा होऊ शकतो. आतापर्यंत ज्या ठिकाणी अडथळे येत होते, ते आता दूर होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल. प्रमोशनसह पगारवाढही मिळू शकते. व्यवसायातही फायदा मिळू शकतो. जुनी आजारपणं आता बरी होऊ शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra)
या राशीच्या लोकांसाठी शनी-सूर्याचा नवपंचम राजयोग भाग्यवान ठरू शकतो. कोर्ट-कचेरीचे प्रश्न सुटून मोठं यश मिळू शकतं. पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. वडिलांशी चांगले संबंध बनू शकतात. अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. स्पर्धकांवर तुमचं वर्चस्व राहू शकतं. पैशांशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात. खूप काळापासून अडकलेली कामं पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक (Scorpio)
या राशीच्या लोकांसाठी सूर्य-शनीचा नवपंचम राजयोग फायदेशीर ठरू शकतो. खूप काळापासून अडकलेली कामे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कुटुंबात चालू असलेले वाद-विवाद संपतील. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन कमाईची साधने तयार होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कामामुळे प्रमोशन, बोनस किंवा पगारवाढ देऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्यही चांगले राहील.