3rd October Rashi Bhavishya & Marathi Panchang : आज ऑक्टोबर महिन्याचा तिसरा दिवस आहे. आज आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी दुपारी २ वाजून ५९ मिनिटांपर्यंत राहील. तसेच गुरुवारी पहाटे ४ वाजून २४ मिनिटांपर्यंत इंद्र योग जुळून येणार आहे. तर हस्त नक्षत्र दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे.

त्याचप्रमाणे नवरात्रीला आजपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या ९ रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. घटस्थापनेला घरोघरी घट बसवला जातो तर सार्वजनिक मंडळात दुर्गा देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. नऊ दिवस गरबा सुद्धा खेळला जातो. तर आज नवरात्रीचा पहिला दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊ या…

३ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल.

वृषभ:- तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल.

मिथुन:- नोकरीत वरचष्मा राहील. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काल निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा.

कर्क:- हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल. अधिकार्‍यांवर छाप पाडता येईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह:- सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. आवडीचे पदार्थ चाखाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल.

कन्या:- आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल.

तूळ:- योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल.

वृश्चिक:- लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.

धनू:- सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. प्रलंबित येणी मिळतील.

मकर:- मन:शांति लाभेल. जुन्या चिंता मिटतील. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.

कुंभ:- नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

मीन:- बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनाचा त्रास संभवतो. अति साहस करायला जाऊ नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर