Sun Made Neechbhang Rajyog:  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो त्याचा थेट परिणाम देश-जगावर आणि मानवी जीवनावर होतो. आता १८ ऑक्टोबरला सुर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे सुर्यदेवाच्या गोचरामुळे ‘नीचभंग राजयोग’ तयार होणार आहे. सूर्यदेव निर्मित ‘नीचभंग राजयोग’ काही राशींसाठी अतिशय लाभदायी ठरु शकतो. या राशीतील लोकांना प्रचंड धनलाभाची संधी मिळू शकते. चला तर मग पाहूया कोणत्या राशींसाठी या राजयोगाचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळू शकतो.

‘या’ राशींना मिळणार पैसा?

कन्या राशी

‘नीचभंग राजयोग’ कन्या राशींच्या मंडळीसाठी लाभकारी ठरु शकतो. या राशीतील व्यवसायात गुंतलेल्यांना जास्त फायदा होऊ शकतो. चांगली बातमी मिळू शकते.  या दरम्यान कामाच्या संदर्भात केलेले अनेक प्रवास तुमच्यासाठी खूप फलदायी ठरू शकतात. यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच, या काळात अविवाहित लोकांकडे लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

धनु राशी

धनु राशीतील लोकांसाठी ‘नीचभंग राजयोग’ भाग्य चमकवणारा ठरु शकतो. या राशीतील तरुणांना चांगल्या पॅकेजसह नवीन कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येऊ शकतो. व्यापारात नवीन भागीदारासोबत नवीन प्रकल्पाची सुरुवात करु शकता. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. आकस्मिक धनलाभ होऊ शकतो.

मकर राशी

मकर राशींतील लोकांना आता चांगले दिवस अनुभवता येऊ शकतात. ‘नीचभंग राजयोग’ बनल्याने सर्वच क्षेत्रातील मंडळींना शुभवार्ता ऐकायला मिळू शकतात. कायदेशीर प्रकरणात निकाल तुमच्या बाजुने लागण्याची शक्यता आहे. मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे या काळात मार्गी लागू शकतात. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)