November Graha Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात ग्रहांचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. नुकतीच नोव्हेंबर महिन्याची सुरूवात झाली असून या महिन्यामध्ये देखील काही ग्रहांचे राशी परिवर्तन पाहायला मिळेल. या महिन्यामध्ये शनी, शुक्र, बुध, सूर्य आणि गुरू आपल्या चालीत बदल करतील.

पंचांगानुसार, २ नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत तर २६ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत गोचर करेल. तसेच १० नोव्हेंबर रोजी बुध वक्री होईल त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी तूळ राशीत प्रवेश करून २९ नोव्हेंबर रोजी मार्गी होईल. तसेच ११ नोव्हेंबर रोजी गुरू ग्रह कर्क राशीत वक्री होईल आणि २८ नोव्हेंबर रोजी शनी देव मार्गी होईल. १६ नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

नोव्हेंबर महिना या राशींसाठी शुभ

वृश्चिक (Vrsuchik Rashi)

नोव्हेंबर महिना वृश्चिक राशीच्या लोकांचा भरपूर आत्मविश्वास वाढेल. या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. बराच काळ अडकलेले प्रकल्प आता गती घेतील. आर्थिकदृष्ट्या काही सकारात्मक हालचाली झाल्याचे दिसू शकते. घरगुती वातावरण प्रसन्न राहील आणि काहींना कौटुंबिक आनंदाचे प्रसंगही लाभतील. हा काळ स्वतःला नवी ऊर्जा देणारा, आत्मविश्वास वाढविणारा ठरू शकतो.

तूळ (Tula Rashi)

नोव्हेंबर महिना हा तूळ राशीसाठी खूप शुभ काळ ठरू शकतो, या राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ देऊ शकते. समाजात पद-प्रतिष्ठा वाढेल. भाग्य अधिक मजबूत होईल आणि लोकांचा विश्वास वाढेल. नातेसंबंधात गोडवा येईल; आर्थिक स्थिती सुधारेल, काहींसाठी नवीन कमाईचे मार्गही खुलतील. एकंदरीत, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना नाव, ओळख आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरू शकतो.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. हा महिना सकारात्मक बदलांचा काळ ठरू शकतो. करिअरमध्ये मोठा निर्णय तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. दीर्घकाळ चाललेल्या प्रयत्नांना आता यशाची साथ मिळू शकते. हा काळ तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक मजबूत करणारा आणि भविष्याबद्दल आत्मविश्वास देणारा ठरू शकतो. मोठा धनलाभ या काळात होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील आणि पालकांचा पाठिंबा मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)