Numerology Predictions: अंक ज्योतिष शास्त्र हे असं ज्योतिष शास्त्र आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याच्या स्वभाव, नशिब आणि भविष्यासंदर्भात अंदाज लावला जातो. या ज्ञानानुसार १ ते ९ पर्यंतच्या प्रत्येक अंकाचा वेगळा प्रभाव आणि खासियत असते, जी व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करते. यासाठी जन्मतारखेच्या अंकांची बेरीज करून एक मूलांक काढला जातो.
मूलांक ३ असलेल्या लोकांची वैशिष्ट्ये (3 Mulank People Personality)
जे लोक कुठल्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेले असतात, त्यांचा मूलांक ३ मानला जातो. या अंकाचा स्वामी ग्रह गुरु आहे, ज्याला शिक्षण, ज्ञान, संतती आणि धर्माचा कारक मानले जाते. त्यामुळे मूलांक ३ असणारे लोक धाडसी, आत्मविश्वासी आणि दूरदृष्टी असलेले असतात.
संघर्षशील आणि स्वावलंबी स्वभाव
या तारखेला जन्म झालेले लोक मेहनती आणि संघर्षशील मानले जातात. ते त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना ठाम निश्चयाने सामोरे जातात. त्यांना कुणावर अवलंबून राहणं किंवा उपकार घेणं आवडत नाही आणि ते स्वतःच्या मेहनतीने यश मिळवणं योग्य मानतात.
स्वाभिमानी आणि दृढनिश्चयी व्यक्तिमत्व
मूलांक ३ असलेले लोक स्वाभिमानाला खूप महत्त्व देतात आणि कोणासमोर झुकणं त्यांना आवडत नाही. हे लोक जे काम ठरवतात, ते पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतात. त्यांची दूरदृष्टी त्यांना भविष्यातील परिस्थितीचा अंदाज लावण्यास सक्षम बनवते.
बालपणात संघर्ष, नंतर समृद्धी
या लोकांचे बालपण अनेक वेळा आव्हानांनी भरलेले असते, पण जसजसे ते मोठे होतात, तसतशी आर्थिक स्थिती सुधारते. वेळ जसजसा पुढे जातो, ते संपन्न होतात आणि धन-संपत्ती वाढते. प्रशासकीय सेवा, पोलीस, बँकिंग किंवा उच्च पदांवर यश मिळण्याची शक्यता जास्त असते.
नातेसंबंध आणि जोडीदाराबद्दलच्या भावना
मूलांक ३ असलेले लोक प्रेम जीवनात फारसे यशस्वी नसतात, पण लग्नानंतर त्यांचं वैवाहिक आयुष्य स्थिर आणि आनंददायक राहतं. भावंडांसोबत त्यांचे नाते घट्ट आणि मजबूत असते. धार्मिक स्वभावामुळे त्यांना पूजा-पाठ आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रस असतो. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने त्यांना आयुष्यात अनेकदा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)