Numerology Predictions: अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाचा स्वामी एक ग्रह असतो. त्यात राहू ग्रहाचाही समावेश आहे; पण ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू या ग्रहांना कोणत्याही राशीचा स्वामी मानले जात नाही.
मूलांक म्हणजे जन्मतारखेतील आकड्यांची बेरीज करून आलेला आकडा असतो आणि प्रत्येक मूलांकाचा स्वामी एक ग्रह असतो. अंकशास्त्रात राहूला ४ अंक किंवा मूलांक ४ चा स्वामी मानले जाते. राहू हा एक क्रूर ग्रह आहे; पण जर त्याची कृपा झाली, तर तो खूप फायदे देतो. पण जर तो अशुभ फळ देऊ लागला, तर तो एखाद्या व्यक्तीला गरीब, अपयशी, गोंधळलेला व दुर्दैवी बनवतो.
‘या’ तारखेल्या जन्मलेल्या लोकांचं जीवन संघर्षमय (People Born in this dates Face Struggle, Poverty)
मूलांक ४ असलेल्या लोकांवर राहूचा विशेष प्रभाव असतो. कारण- राहू हा मूलांक ४ चा स्वामी आहे. ज्या लोकांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ४, १३ किंवा २२ तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक ४ असतो. राहू ग्रह मायावी असतो आणि तो गोंधळ निर्माण करतो.
मूलांक ४ असलेल्या लोकांवर जर राहूचा वाईट प्रभाव असेल, तर ते हट्टी, रागीट व अहंकारी होतात. असे लोक स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेतात.
राहूच्या प्रभावामुळे मूलांक ४ असलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. त्यांच्या आयुष्यात एकामागोमाग एक अडचणी येत राहतात. ते सहजपणे वाईट संगतीत राहू शकतात. आयुष्यात चढ-उतार येतात. पण जर त्यांनी चांगली वागणूक ठेवली आणि ते व्यसन व वाईट सवयी यांपासून दूर राहत, मेहनत करीत राहिले, तर त्यांना नक्की यश मिळते.
हे लोक स्वभावाने आनंदी असतात आणि इतरांच्या पटकन प्रभावाखाली येतात. त्यामुळे त्यांची कुणाशीही लवकर मैत्री होते; पण राग आणि अहंकारामुळे शत्रुत्वही लवकर होते.
हे लोक राहूच्या प्रभावामुळे नेहमी गोंधळात राहतात. त्यांना बरोबर आणि चूक यात फरक करता येत नाही. त्यांचे पार्टनरसोबतही सहज जमत नाही; पण लग्नानंतर त्यांची परिस्थिती थोडी चांगली होते.
मूलांक ४ असलेल्या लोकांना करिअरमध्ये अडथळे आणि आव्हानांना सामोरे जावे लागते. काही लोकांचे शिक्षणसुद्धा अपूर्ण राहते. पण, जे लोक संघर्ष आणि मेहनत सोडत नाहीत, ते खूप यशस्वी होतात. हे लोक राजकारणात मोठी पदे मिळवतात. त्याचबरोबर हे इंजिनीयर, व्यापारीसुद्धा होतात.