Numerology Predictions: अंकज्योतिषात एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा स्वभाव, गुणधर्म आणि जीवनाबद्दलच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी कळू शकतात. जन्मतारखेतील अंकांची बेरीज करून एक खास अंक काढला जातो, त्याला मूलांक म्हणतात.
मूलांक हा १ ते ९ या अंकांमध्ये असतो आणि तो व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व, विचारसरणी आणि वागणुकीवर मोठा परिणाम करतो. आज आपण अशाच एका खास मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या मूलांकाच्या मुलींना पैशाची खूप लालसा असते आणि त्या कधी कधी पैशाच्या स्वार्थासाठी काहीही करतात.
मूलांक ५ (Mulank 5 Girls)
अंकज्योतिषानुसार, ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला होतो, त्यांचा मूलांक ५ असतो. या अंकाचा स्वामी ग्रह बुध आहे, जो बुद्धिमत्ता आणि चातुर्य यांचा प्रतीक मानला जातो.
म्हणूनच मूलांक ५ असलेल्या मुलींमध्ये तीक्ष्ण बुद्धी, जलद विचार करण्याची आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची खास क्षमता असते. त्या आपले काम करून घेण्यात हुशार असतात आणि इतरांना आपली गोष्ट मान्य करायला सहज तयार करतात.
याशिवाय, मूलांक ५ असलेल्या मुली आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कुठल्याही टप्प्यापर्यंत जाऊ शकतात आणि गरज पडल्यास लगेच आपली योजना बदलतात.
मूलांक ५ असलेल्या मुलींचा स्वभाव
मूलांक ५ असलेल्या मुली स्वभावाने मिळून मिसळून वागणाऱ्या असतात आणि लवकर मित्र बनवतात. त्यांच्या ओळखीच्या लोकांचा गोतावळा मोठा असतो, पण त्यांना नेहमी पैशाबद्दल खास आकर्षण असते.
पैशाच्या मोहामुळे त्या अनेकदा प्रेमसंबंध ठेवू शकतात, पण असे संबंध कायम टिकत नाहीत. अंकज्योतिषानुसार, त्यांच्या वैवाहिक जीवनात दोन विवाह होण्याची शक्यता असते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)