Numerology Predictions: अंकशास्त्रानुसार १ ते ९ या अंकांचे वेगवेगळे अर्थ असतात. प्रत्येक अंकावर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव असतो, त्यामुळे त्या अंकांशी संबंधित लोकांचे स्वभावही वेगळे असतात. आज आपण अशा मुलींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या त्यांच्या नवऱ्यासाठी आणि सासरच्या लोकांसाठी शुभ मानल्या जातात.

ज्या मुलींचा जन्म महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला होतो, त्यांचा मूलांक ६ असतो. या मूलांकावर शुक्र ग्रह म्हणजे प्रेमाचा आणि सौंदर्याचा ग्रह राज्य करतो.

या मूलांकाच्या मुली सासरी खूप प्रेम आणि मान मिळवतात. त्या मोकळ्या विचारांच्या असतात, त्यांना माहेरासोबत सासर आणि नवऱ्याचेही भरपूर प्रेम मिळते. चला तर मग जाणून घेऊया मूलांक ६ असलेल्या मुलींच्या काही खास गोष्टी…

पतीसाठी आणि सासरसाठी शुभ आणि भाग्यवती (Mulank 6 Girls Marriage)

अंकशास्त्रानुसार ज्या मुलींचा मूलांक ६ असतो, त्या मुली पती आणि सासरसाठी भाग्यशाली मानल्या जातात. अशा मुली सासरी अधिकाराने राहतात. त्या मोकळ्या विचारांच्या असतात. त्यांना माहेरासह सासर आणि पतीकडून भरपूर प्रेम मिळतं.

या मुलींना पैशाची किंमत माहिती असते (मनी माइंडेड असतात). त्या पतीच्या व्यवसायातही साथ देतात. या मुली आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्याशी प्रामाणिक असतात. त्या नेहमी कुटुंबातील सर्व नातेसंबंध सांभाळून ठेवतात.

रोमँटिक असतात

मूलांक ६ असलेल्या मुली थोड्या रोमँटिक स्वभावाच्या असतात. त्या नेहमी आपल्या घरात आनंदाचे आणि शांततेचे वातावरण ठेवतात. त्या थोड्या खर्चिक स्वभावाच्या असतात. तसेच त्या व्यवहारिक असतात आणि प्रत्येक काम नीटनेटकेपणाने करतात. त्यांचा सासरी पाय पडताच घरात सुख-समृद्धी येते. त्या आपलं घर स्वर्गासारखं सजवून ठेवतात.

मूलांक ६ असलेल्या लोकांचा शुभ अंक (Mulank 6 Lucky Number)

मूलांक ६ असलेल्या लोकांसाठी सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार हे दिवस शुभ मानले जातात. शुभ अंक ६, १५ आणि २४ असे आहेत. याशिवाय पांढरा आणि निळा रंग यांच्यासाठी शुभ मानला जातो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)