Numerology Predictions: अंकशास्त्रात मूलांक माणसाच्या स्वभाव, विचारसरणी, गुण-दोष आणि जीवनाच्या प्रवासावर परिणाम करतो असे मानले जाते. मूलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेतील आकड्यांची बेरीज करून मिळणारा अंक.

उदाहरण : जर एखाद्याचा जन्म १५तारखेला झाला असेल, तर १ + ५ = ६ हा त्याचा मूलांक होतो. जर जन्म २४ तारखेला असेल, तर २ + ४ = ६ हा मूलांक मिळतो. म्हणजेच ज्या दिवशी तुमचा जन्म झाला, त्या तारखेतील आकड्यांची बेरीज करून जो एक अंकी अंक येतो, तो तुमचा मूलांक असतो. आज आपण मूलांक ६ असलेले लोक नेमके कसे असतात ते जाणून घेणार आहोत.

मूलांक ६ असलेले लोक (Mulank 6 People)

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ६ असतो. असे लोक सहसा कमी बोलतात, पण त्यांचा गोड आणि आकर्षक आवाज लोकांचे मन जिंकतो. ते जेव्हा बोलतात, तेव्हा आपल्या शब्दांनी इतरांवर छाप पाडतात.

मूलांक ६ असलेल्या लोकांचा स्वभाव (Mulank 6 Behaviour)

मूलांक ६ असलेल्या लोकांना आरामदायी जीवन जगायला आवडतात. ते प्रत्येक काम शांतपणे आणि संयमाने करायला पसंत करतात आणि सुखसोयींनी भरलेल्या वातावरणात राहणे त्यांना आनंद देतं.

सीक्रेट ठेवण्यात कुशल

यांच्याकडे इतरांचे गुपित जपून ठेवण्याची खास क्षमता असते. कोणी आपलं वैयक्तिक रहस्य सांगितलं तर हे व्यक्ती ते पूर्ण विश्वासाने गुप्त ठेवतात.

आकर्षक व्यक्तिमत्व

मूलांक ६ असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व नैसर्गिकरित्या आकर्षक असते. ते आपल्या सुंदरतेने आणि देखण्या अंदाजाने लोकांना प्रभावित करतात. त्यांना नटून थटून राहायला आवडते आणि बाह्य व्यक्तिमत्त्व खुलवण्यात ते विश्वास ठेवतात.

थोडे गर्विष्ठ

हे लोक फक्त थोड्याच लोकांशी जवळीक ठेवतात आणि प्रत्येकाशी मैत्री करत नाहीत. अनेकदा त्यांचं वागणं इतरांना अहंकारी वाटू शकतं, कारण त्यांना स्वतःला श्रेष्ठ मानण्याची सवय असते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)