Numerology Predictions: अंकज्योतिषानुसार, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि जीवनाच्या प्रवृत्ती त्याच्या जन्मतारीख आणि मूलांकावर आधारित असतात. प्रत्येक मूलांकामागे एक ग्रह असतो, जो त्या व्यक्तीच्या वागणुकीवर आणि विचारांवर परिणाम करतो.
अंकज्योतिष शास्त्रानुसार, एक असा मूलांक आहे, ज्यामध्ये जन्म घेणारे लोक बहुतेक वेळा इतरांचं मन दुखावण्यात माहिर मानले जातात. हे लोक सौंदर्य आणि भौतिक सुखांकडे जास्त आकर्षित होतात आणि नात्यांपेक्षा पैसा आणि ऐशोआरामाला जास्त महत्त्व देतात.
अंकज्योतिषामध्ये मूलांक काढण्यासाठी व्यक्तीच्या जन्मतारीखेतील आकड्यांची बेरीज करून एक आकडा तयार केला जातो.
उदाहरण: जर एखाद्याचा जन्म १५ तारखेला झाला असेल, तर १ + ५ = ६, म्हणजे त्या व्यक्तीचा मूलांक ६ असेल. मूलांक १ ते ९ पर्यंत असतात आणि त्यांचा संबंध सूर्यापासून केतूपर्यंतच्या नवग्रहांशी असतो.
मूलांक ६ चा स्वामी ग्रह म्हणजे शुक्र, जो सौंदर्य, ऐशोआराम, प्रेम आणि भौतिक सुखांचं प्रतीक आहे. मूलांक ६ असलेले लोक खूप आकर्षक, स्मार्ट आणि माणसांमध्ये मिसळणारे असतात, पण हे लोक स्वतःचा फायदा आणि इच्छा सर्वात महत्वाच्या मानतात. यांच्यासाठी नात्यांपेक्षा सौंदर्य, आकर्षण आणि पैसा हे अधिक महत्त्वाचे असते.
‘या’ तारखेला जन्मलेले लोक तोडतात नाती (People Born in this dates can Break Your Heart)
मूलांक ६ असलेले लोक अनेकदा खूप लवकर आकर्षित होतात, विशेषतः एखाद्याचं सौंदर्य किंवा चमक-धमक पाहून. हे लोक कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेले असतात.
सुरुवातीला हे लोक खूप प्रेमळ आणि आकर्षक वाटतात, पण जसं त्यांच्यासमोर दुसरं कोणतं नवीन आकर्षण येतं, तसं ते जुन्या नात्यांपासून लांब जाऊ लागतात. अनेकदा हे लोक जुने आणि दीर्घकाळाचे संबंधही अचानक तोडून टाकतात, ज्यामुळे समोरचा व्यक्ती भावनिकदृष्ट्या तुटून जातो.
शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक त्यांच्या आयुष्यात श्रीमंत जीवनशैली, पैसा आणि भोग-विलास यांना नात्यांपेक्षा जास्त महत्त्व देतात. हीच त्यांची प्रवृत्ती अनेक वेळा त्यांना स्वार्थी आणि मन तोडणारे सिद्ध करते. हे लोक आपल्या ध्येयांना मिळवण्यासाठी काहीही करू शकतात, अगदी नाती तुटली तरीही चालतात.