Numerology Predictions: मूलांक एखाद्या ग्रहाशी जोडलेला असतो आणि तो व्यक्तीच्या स्वभाव, विचार, निर्णय घेण्याची क्षमता आणि नशिबावर परिणाम करतो. अंक ज्योतिष शास्त्रात मूलांकाला जीवनाची दिशा समजून घेण्यासाठी एक प्रभावी मार्ग मानले जाते. म्हणूनच आज आपण मूलांक ७ बद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
अंक ज्योतिष हे एक रहस्यमय शास्त्र आहे, ज्यामध्ये प्रत्येक अंकामागे एक खास ऊर्जा, प्रभाव आणि संकेत लपलेला असतो. एखाद्या व्यक्तीचा जन्म दिनांक, महिना आणि वेळ मिळून एक मूलांक तयार होतो.
‘या’ तारखेला जन्मलेले असतात मूलांक ७ चे लोक (Numerology of 7, 14, 25 Birth Dates)
अंक ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या ७, १४ किंवा २५ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ७ असतो. या मूलांकाचा ग्रह स्वामी केतु आहे, जो रहस्य, अंतर्ज्ञान आणि खोल विचारांचा प्रतीक मानला जातो.
मूलांक ७ असलेले लोक खूप नशिबवान मानले जातात. हे जे काही आयुष्यात इच्छितात, ते मिळवण्याची क्षमता त्यांच्यात असते.
अंक ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक ७ असलेले लोक बाहेरून शांत आणि गंभीर दिसतात, पण आतून ते खूप विचार करणारे आणि समजूतदार असतात.
या मूलांकाचे लोक सहजपणे कुणाशीही आपली गोष्ट शेअर करत नाहीत, पण एकदा सांगायला लागले की, समोरचा त्यांचं ज्ञान आणि विचारांची खोली पाहून नक्कीच प्रभावित होतो.
मूलांक७ असलेले लोक परिस्थिती नीट समजून निर्णय घेतात आणि बहुतेक वेळा त्यांचा निर्णय बरोबर ठरतो.
मुलगा असो किंवा मुलगी, त्यांचा चेहरा शांत, सौम्य आणि आकर्षक असतो. त्यांची बोलणं आणि वागणं समोरच्याला सहजपणे प्रभावित करतं.
मूलांक ७ असलेले लोक जरी जास्त बोलत नसले, तरी ते लोकांचा खरा स्वभाव ओळखण्यात हुशार असतात.