Numerology Predictions: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाला आयुष्य, दु:ख, आजार, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोखंड, खनिज तेल, कर्मचारी, सेवक, तुरुंग इत्यादींचा कारक मानले जाते. तसेच, अंक ८ वर शनिदेवांचा अधिपत्य असतो. म्हणजेच या अंकाचा संबंध शनिदेवांशी असतो. ज्यांचा जन्म महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला होतो, त्यांचा मूलांक ८ असतो.

ज्यांच्यावर मूलांक ८ चा प्रभाव असतो, अशा लोकांवर शनिदेवांची विशेष कृपा असते. ८ अंक असलेले लोक शिस्तप्रिय आणि मेहनती असतात. या लोकांना नियम तोडायला आवडत नाही. ते नेहमी आपल्या मनासारखे जीवन जगतात. तसेच, ते पैसे कमवण्यातही कुशल असतात.

चला तर मग, मूलांक ८ विषयी आणखी माहिती जाणून घेऊया…

३० वर्षांनंतर नशीब चमकते (Mulank 8 People)

अंकशास्त्रानुसार मूलांक ८ असलेल्या लोकांवर शनिदेवांची खास कृपा असते. हे लोक खूप मेहनत करणारे असतात. हे लोक मेहनतीच्या जोरावर श्रीमंत होतात. अशा लोकांना लहानपणी फारसे सुख मिळत नाही. त्यांचं नशीब ३० वर्षांनंतरच चमकते. म्हणजे हे लोक साधं जीवन जगतात पण त्यांचे विचार मोठे असतात.

पैसे वाचवण्यात पुढे (Shani Blessed Mulank)

मूलांक ८ असलेले लोक स्वतःच्या अटींवर काम करतात. त्यांना आळस अजिबात आवडत नाही. हे लोक ना कुणाची खुशामद करतात, ना स्वतःची खुशामद होऊ देतात. हे लोक पैशांची बचत चांगली करतात. यांचे वडिलांसोबत नातं खूप मजबूत नसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैवाहिक आयुष्यात, यांचे जोडीदारासोबत लहानसहान भांडणं होत राहतात. मूलांक ८ चे लोक व्यवस्थीत आणि नियोजनबद्ध जीवन जगायला आवडतात. त्यांना गोंधळ किंवा बिघडलेपणा आवडत नाही.

८ अंक असलेल्या लोकांनी शनिदेवांची पूजा केली पाहिजे, कारण त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मकता येते. तसेच, हनुमानजीची पूजा केल्यानेही त्यांना लाभ होतो.

या क्षेत्रांमध्ये मिळते यश

मूलांक ८ असलेल्या लोकांनी इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, तेल, पेट्रोल पंप, रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन आणि लोखंडाशी संबंधित व्यवसाय करावा. अशा क्षेत्रांमध्ये त्यांना चांगले यश मिळू शकते.