Mulank 8 Personality Traits : अंकशास्त्रामध्ये ९ अंकाचे वर्णन दिसून येते. या अंकावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे वर्चस्व दिसून येते. आज आपण मूलांक ८ विषयी जाणून घेणार आहोत. मूलांक ८ चा स्वामी ग्रह शनि देव असतो. शनि देवाला न्यायाचा देवता मानले जाते.
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक ८ असतो. हे लोग नशीबापेक्षा कर्मामध्ये विश्वास जास्त ठेवतात. या लोकांवर शनि देवाची विशेष कृपा दिसून येते. हे लोक फायनान्स, पैशांची देवाणघेवाण चांगल्याने मॅनेज करतात. जाणून घेऊ या लोकांचे व्यक्तिमत्व आणि करिअर कसे असते?

अपार धन- संपत्तीचे मालक असतात

अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक ८ असतो, त्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा दिसून येते. हे लोक अपार धन संपत्तीचे मालक असतात. या लोकांना गोष्टी मॅनेज करून चालायला आवडते. या लोकांना दिखावा अजिबात आवडत नाही. त्यांना भौतिकता आणि आध्यात्मिकतामध्ये संतुलन ठेवायला आवडते.

या लोकांना साधे आयुष्य जगायला आवडते तसेच हे लोक उच्च विचाराने जगणारे असतात. हे लोक कोणतेही काम शांतपणे करतात आणि पूर्ण करतात. हे लोक आपल्या मेहनतीने आणि बुद्धीने पैसा कमवतात. या मूलांकचे लोक फक्त स्वत:वर नाही तर दुसऱ्यांवर पैसा खर्च करतात.

पैसा कमवण्यात खूप हुशार असतात हे लोक

मूलांक ८ असलेले लोक पैसा कमावण्यात हुशार असतात. तसेच या लोकांना न्याय खूप आवडतो. मूलांक ८ असलेल्या लोकांना कर्मावर आधारावर फळ प्राप्त करायला आवडते.
या लोकांना कर्मावर विश्वास असतो. हे एकाकी आणि एकांत प्रिय असतात ज्यामुळे ते समाजापासून वेगळे होतात. तसेच हे लोक कोणत्याही ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि या लोकांचे आयुष्य ३० वर्षानंतर चमकते.

या क्षेत्रात मिळवतात यश

अंकशास्त्रनुसार मूलांक ८ शी संबंधित लोक पेट्रोल, ऑइल, लोह आणि खनिज पदार्थाशी संबंधित व्यवसाय करते. या लोकांना चांगले यश मिळू शकते. जर या लोकांना नोकरी करायची असेल तर हे लोक इंजिनिअर, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल, तेल, पेट्रोलपंप, रिअल इस्टेट, कंस्ट्रक्शनशी संबंधित करिअरची निवड करत असेल तर त्यांना यश मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)