Numerology Predictions : अंकशास्त्रात आपल्या जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकावरून काही प्रमाणात बऱ्या-वाईट घडणाऱ्या गोष्टींचे भविष्यकथन केले जाऊ शकते. तर आज आपण ९ मूलांक असणाऱ्या व्यक्तींबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ९ मूलांक असणाऱ्या मंडळींचे प्रेम जीवन, त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या करिअरच्या पर्यायांचा आपण अभ्यास करणार आहोत.
तर सगळ्यात पहिला लक्षात ठेवा की, कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ९ असतो. तुमचा मूलांक काय आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेचा एकांक काढावा लागेल. उदाहरणार्थ- तुमची जन्मतारीख १८ असेल, तर १+८ = ९. म्हणजे तुमचा मूलांक ९ असणार आहे. या मूलांकावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो.
९ मूलांक असणारी मंडळी कशी असतात?
९ अंकाचे लोक धाडसी, आत्मविश्वासू, अत्यंत प्रामाणिक, उत्साही असतात. मंगळाच्या उर्जेमुळे ही मंडळी कठीण काळातही शांत राहून परिस्थिती हाताळतात आणि आयुष्यभर शिस्तबद्ध पद्धतीने जीवन जगतात. जे बोलतात ते करूनच दाखवतात आणि इतरांना मदत करण्यास कधीही मागेपुढे पाहत नाहीत. स्वभावाने दयाळू, पराभवाला तोंड देऊनही जिंकण्याची वृत्ती त्यांच्यात असते.
९ मूलांकासाठी योग्य करिअर
९ मूलांक असलेल्या लोकांकडे अनेक करिअर पर्याय असतात; ज्यात संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी, चांगले सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि डॉक्टर यासारख्या सार्वजनिक सेवा व्यवसायात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवतात. ९ मूलांक असलेली मंडळींसाठी एक यशस्वी करिअर पर्याय असू शकतो.
९ मूलांकाची लव्ह लाईफ
ही मंडळी जोडीदाराशी अत्यंत निष्ठावान असतात. त्यांच्या प्रियकरांसाठी काहीही करण्यास तयार असतात. त्यांचे नाते स्थिर असते, त्यांच्या नात्याला अत्यंत धरून ठेवण्याची आणि प्रेम लग्नापर्यंत पोहचवण्याची हिंमत ठेवतात. त्यांच्या वैवाहिक जीवनात जबाबदार भागीदार देखील असतात.
मंगळाच्या कृपेने मिळते यश
९ मूलांक असलेल्या मंडळींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे या व्यक्ती धाडसी आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात. त्यांच्यात भरपूर उत्साह असतो. पण, कधीकधी आळस त्यांच्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. ९ मूलांक असलेल्यांचे करिअर स्थिर असते आणि त्यांच्या कठोर परिश्रमाने ते जीवनाच्या प्रत्येक वळणावर यश मिळवतात.
