Numerology Predictions: अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंकाची एक खास ऊर्जा आणि खास गुणधर्म असतो. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, आर्थिक स्थिती आणि आयुष्याची दिशा कळू शकते. यासाठी सर्वात आधी जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो.
मूलांक कशाला म्हणतात? (What is Mulank)
मूलांक १ ते ९ या अंकांपैकी एक असतो आणि प्रत्येक मूलांकाचा एक ग्रह स्वामी असतो, ज्याचा थेट परिणाम त्या तारखेला जन्मलेल्या लोकांवर होतो. आज आपण अशा मुलींबद्दल बोलणार आहोत ज्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाच्या मुलींचा स्वभाव भावूक, नखरेल आणि कधी कधी अहंकारी मानला जातो.
मूलांक २ची संख्या कशी तयार होते? (Mulank 2)
जर एखाद्या व्यक्तीचा जन्म महिन्यातील २, ११,२० किंवा २९ तारखेला झाला असेल, तर त्याचा मूलांक २ मानला जातो. या अंकाचा स्वामी चंद्र आहे. चंद्राच्या मृदुतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे हा गुण या मूलांकाच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्ट दिसतो.
मूलांक २ असलेल्या मुलींचा स्वभाव (Mulank 2 Girls Behaviour)
अंकशास्त्रानुसार, या मूलांकाच्या मुली खूप लवकर भावूक होतात. लहानशी गोष्ट त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करते. त्या प्रत्येक गोष्टीवर गंभीरपणे विचार करतात आणि संवेदनशील स्वभावामुळे लवकर दुखावूही शकतात.
नखरेल आणि मूडी
अंकशास्त्रानुसार, या मुलींचा स्वभाव थोडासा नखरेल असतो. त्यांचा मूड अचानक बदलतो, कधी खूप आनंदी तर कधी उदास होतात. त्यांचा स्वभाव समजून घेणं सोपं नसतं.
कल्पनाशील आणि अहंकारी
अंकशास्त्र जाणकारांच्या मते, चंद्राच्या प्रभावामुळे मूलांक २ मूलांक असलेल्या मुलींची कल्पनाशक्ती खूप विकसित असते. त्या प्रत्येक गोष्टीवर खोल विचार करतात आणि अनेकदा स्वतःच्या विचारात हरवून जातात. म्हणून कधी कधी त्या अनावश्यक चिंतेतही अडकतात. तसेच, त्या इतरांपेक्षा थोड्या जास्त अहंकारीदेखील असतात.
आत्मविश्वासू आणि दृढनिश्चयी
जरी या मुलींचा स्वभाव मृदु आणि शांत असला, तरी आतून त्या खूप मजबूत असतात. आत्मविश्वासाने भरलेल्या या मुली कठीण काळातही हार मानत नाहीत आणि प्रत्येक आव्हानाचा धैर्याने सामना करतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)