सामुद्रिक शास्त्राच्या मदतीने माणसाच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक भागाची विशेष वैशिष्ट्ये आणि त्यांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव जाणून घेता येतो. याशिवाय व्यक्तीच्या भविष्याबाबतही बरेच काही जाणून घेता येते. पायांच्या आकारावरून व्यक्तिमत्व आणि भविष्य कसे जाणून घ्यायचे हे आज आपण जाणून घेऊया.

पायांची रचना सांगते माणसाच्या स्वभावाविषयी बरेच काही

स्क्वेअर फूट :

ज्या लोकांच्या पायाची सर्व बोटे समान लांबीची असतात, ते स्वभावाने अतिशय शांत आणि स्थिर असतात. ते प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घेतात. याव्यतिरिक्त, ते खूप विश्वासार्ह असतात.

ग्रीक फूट :

ज्या लोकांचा अंगठा बोटापेक्षा लांब असतो, ते सहसा खेळाडू, कलाकार किंवा वक्ते असतात. हे लोक प्रत्येक आव्हानासाठी तयार असतात आणि इतरांवर राज्य करतात.

खुर्चीवर बसण्याची पद्धत सांगते माणसाचे खरे व्यक्तित्त्व; स्वभाव जाणून घेण्याचा खास मार्ग

रोमन फूट :

ज्या लोकांचा अंगठा आणि त्यानंतरची २ बोटे समान लांबीची आणि उरलेली २ बोटे लहान आहेत, असे लोक खूप सामाजिक असतात. त्यांचे कार्यक्षेत्र मोठे असून ते सर्वांचे लक्षपूर्वक ऐकतात.

स्ट्रेच्ड फूट :

ज्यांच्या पायाचा अंगठा सर्वात मोठा आहे आणि त्या नंतरची बोटे उतरत्या क्रमाने आहेत, ते एकटे राहणे पसंत करतात. हे लोक आपल्या गोष्टी सहजासहजी कोणाशीही शेअर करत नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • पायाची करंगळी बाहेरच्या दिशेने असणारे लोक बंडखोर स्वभावाचे असतात.
  • ज्यांच्या पायाची करंगळी चिकटलेली असते, असे लोक सहजासहजी त्यांचा स्वभाव, राहणीमान बदलत नाहीत आणि ते त्याच धर्तीवर जगतात. पण ते खूप चांगले लाइफ पार्टनर ठरतात.
  • ज्या लोकांचे पाय खूप पातळ असतात, ते इतरांना चांगले प्रेरित करतात पण स्वतः काही विशेष करत नाहीत. त्यांना राग आला तर त्यांचे मन वळवणे अवघड जाते.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)