Guru Purnima 2025 :ज्योतिष शास्त्रानुसार व्रत आणि सणाच्या वेळी अनेक दुर्मिळ योग आणि राजयोग निर्माण होतात ज्याचा परिणाम मानवी जीवणावर होतो. यावर्षी १० जुलैला गुरू पोर्णिमा आहे आणि या दिवशी कित्येक दुर्मिळ संयोग निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे गुरू आदित्य राजयोग निर्माण होत आहे. गुरु आणि सूर्याची युती मिथुन राशीत तयार होत आहे ज्यामुळे हा योग निर्माण होत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या भाग्यवान राशी आहेत..
कन्या राशी (Kanya Zodiac)
गुरु आदित्य राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या कुंडलीतील दहाव्या घरात होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला व्यवसायात चांगले यश मिळू शकते. तसेच नोकरदार लोकांची पद्दोन्नती होऊशकते. त्याचबरोबर, हा काळ तुमचा सामाजिक वर्तूळ वाढवण्यासाठी आणि नवीन संबंध निर्माण करण्यासाठी अनुकूल असेल. तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि उत्पन्नाच्या नवीन संधी येऊ शकतात. तुमची ओळख मजबूत करण्यासाठी आणि नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. यावेळी व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो.
सिंह राशी (Leo Zodiac)
गुरु आदित्य राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. कारण हा राजयोग लोकांच्या पैशाच्या उत्पन्नावर आणि फायद्यावर आधारित असेल. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होईल. दीर्घकालीन योजना राबवण्यासाठी आणि सामाजिक प्रभाव वाढवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तसेच यावेळी व्यापारी वर्ग काही मोठे व्यावसायिक सौदे करू शकतो. जे भविष्यात फायदेशीर ठरेल. त्याच वेळी, मुलाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.
वृषभ राशी (Taurus Zodiac)
गुरु आदित्य बनणे राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण गुरु आणि सूर्य तुमच्या राशीशी युतीत आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभाचे योग येतील. त्याच वेळी, संगीत आणि सर्जनशीलता कामांमध्ये तुमची आवड वाढू शकते. तुम्हाला तुमच्या संगीताची प्रशंसा मिळू शकते आणि घरी एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते. यावेळी व्यापार्यांना कर्ज मिळू शकते.