Panchak twice in Diwali month 2025: हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीचा ऑक्टोबर महिना आता सुरू झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या सणाच्या महिन्यात दोन वेळा पंचक येणार असल्याने ती चिंताजनक बाब आहे.
पंचकला हिंदू धर्मात अशुभ मानलं जातं. त्यामुळे पंचक असताना कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. प्रत्येक महिन्यात एकदा पंचक येतो आणि तो ५ दिवस चालतो. या ५ दिवसांच्या दरम्यान कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही असं मानलं जातं. ऑक्टोबर महिन्यात पंचक दुप्पट चिंता वाढवत आहे. ऑक्टोबरमध्ये दोन वेळा पंचक येत आहे. याच महिन्यात दिवाळीदेखील असल्याने ही मोठी चिंतेची बाब असल्याचे शास्त्रानुसार दर्शवते. दिवाळीच्या महिन्यात दोन वेळा पंचक येणं अशुभ मानलं जात आहे. या काळात आपत्ती, खूप पाऊस किंवा मोठी दुर्घटना होण्याचे शंका वर्तविली जात आहे.
कधी आहे पंचक?
२०२५च्या ऑक्टोबर महिन्यात दोन वेळा पंचक येत आहे. पहिला पंचक ३ ते ८ ऑक्टोबर दरम्यान चालणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबरपासून पुन्हा पंचक लागणार आहे. तेव्हा पंचक ४ नोव्हेंबरपर्यंत असेल. अशाप्रकारे ऑक्टोबर महिन्याचा शेवट पंचकनेच होणार आहे. दसऱ्यानंतर आणि मग दिवाळीनंतर पुन्हा पंचक येणं अशुभ घटनांना कारणीभूत ठरू शकतं. यामध्ये चांगली गोष्ट अशी की, दोन्ही वेळेला पंचक कुठल्याही महत्त्वाच्या दिवशी होणार नाहीत, ज्यामुळे पूजाकार्यात अडथळा निर्माण होईल.
पंचक काळात ‘ही’ काम अजिबात करू नका
- पंचक काळात कोणतंही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. या काळात कुठलंही नवीन काम सुरू करू नक, कुठल्याही नवीन गोष्टी खरेदी करू नका. दिवाळीसाठी साफसफाई जरी करायची असेल तर ती ९ ऑक्टोबरपासून पंचक संपल्यावर सुरू करा. घरात रंगकाम वगैरे करू नका. जर कोणतंही काम पंचक लागण्या आधीपासून सुरू असेल तर ते सुरू ठेवू शकता.
- पंचक काळात लाकडासंबंधित कोणतीही वस्तू खरेदी करू नका. दिवाळीआधी जर घराला रंग किंवा फर्निचर वगैरे खरेदी करायचा विचार करत असालतर पंचक काळात हे काम करू नका.
- पंचक काळात घरबांधणीला सुरूवात, छप्पर टाकणं, चौकट बसवणं हेदेखील अशुभ मानलं जातं.
- पंचक काळात बिछाना, पलंग, गाद्या हे खरेदी करू नका. अशी कृती तुमच्या आयुष्यात संकट ओढावू शकते.
- पंचक काळात जर कोणाचा मृत्यू झाला, तर ज्योतिषांचा सल्ला घेऊन त्यानुसार अंत्यविधीचे संस्कार करावेत.
- पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करणं अशुभ मानलं जातं.
पंचक कधी लागतात?
जेव्हा चंद्र धनिष्ठा नक्षत्र, पूर्वाभाद्रपद, शतभिषा, उत्तर भाद्रपद आणि रेवती नक्षत्रात भ्रमण करतो तेव्हा पंचक लागतो. जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत भ्रमण करतो, तेव्हासुद्धा पंचक लागतो. धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र पंचकाच्या अंतर्गत येतात. या सर्व नक्षत्रांपासून तयार होणाऱ्या योगालाच पंचक असं म्हटलं जातं. पंचकाचा काळ पाच दिवसांचा असतो त्यामुळे त्याला ‘पंचक’ असं म्हणतात.