Aajche Rashi Bhavishya In Marathi 3 september 2025 : आज ३ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. आज परिवर्तिनी एकादशी असणार आहे. परिवर्तिनी एकादशी म्हणजे परिवर्तनाची एकादशी. त्याचबरोबर आज पूर्वाषाढा नक्षत्र जागृत असणार आहे आणि आयुष्यमान योग जुळून येणार आहे. आज राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तर आज तुमच्या राशीच्या आयुष्यात कशाचे परिवर्तन होणार जाणून घेऊयात…

३ सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi, 3 september 2025 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today in Marathi)

जुन्या कामांमधून यश मिळेल. घरात धार्मिक कार्य घडेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवसाच्या पूर्वार्धात रखडलेली कामे मार्गी लागतील. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today in Marathi)

सामाजिक मुद्यात लक्ष घालू नका. अपेक्षित उत्तर मिळेल. नवीन ओळखीतून लाभ होईल. अप्रिय व्यक्तीची भेट घडू शकते. शासनाकडून लाभाची शक्यता.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)

घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. मन काहीसे विचलीत राहील. मुलांची प्रगती पाहून मन खुश होईल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today in Marathi)

मानसिक चंचलता राहील. अति विचार करू नका. महत्त्वाची कामे आज टाळावीत. कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागेल. जवळचे मित्र भेटतील.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today in Marathi)

प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. अति कामामुळे थकवा जाणवेल. बोलण्यातील माधुर्यामुळे मान मिळवाल. व्यापारीवर्ग खुश राहील. कामाची धावपळ वाढेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today in Marathi)

रखडलेली कामे पूर्ण करा. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. मन प्रसन्न राहील. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च होतील. व्यापारी क्षेत्रातील प्रयत्न फळाला येतील.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today in Marathi)

योग्य शहानिशा करावी. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. आनंदाची अनुभूति घ्याल. धनलाभाचे उत्तम योग आहेत. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today in Marathi)

नवीन खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी अति घाई करू नये. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. गुंतवणुकी संदर्भात नवीन गोष्टी जाणून घ्याल. अति विचारात वेळ वाया घालवू नका.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)

मानसिक शांतता लाभेल. कामात तुमचा उत्तम प्रभाव पडेल. सासरच्या मंडळीकडून धनलाभाचे योग आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. जुने काम मार्गी लावण्याची संधी मिळेल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today in Marathi)

धार्मिक कामाची आवड वाढेल. जोडीदाराच्या कलाने काम करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मिळकतीच्या बाबतीतील प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. भावनात्मकता टाळावी.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today in Marathi)

जोडीदाराचे म्हणणे टाळू नका. खेळ व कलेमध्ये रमाल. अति भावुक होऊ नका. पराक्रमाला चांगला वाव आहे. नियोजना अभावी कामे रेंगाळू शकतात.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today in Marathi)

आरोग्यात सुधारणा होईल. कामात अधिक स्फूर्ति येईल. मुलांसोबत दिवस खेळीमेळीत जाईल. उधारीचे व्यवहार करू नका. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर