Numerology : ज्योतिषशास्त्रामध्ये राशींना खूप महत्त्व असते तसेच अंकशास्त्रामध्ये अंकाना खूप महत्त्व असते. व्यक्तिच्या जन्मतारखेवरून आपण व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेऊ शकतो. हल्ली अनेक जण अंकशास्त्रामध्ये आवड दाखवत आहे, ज्यामध्ये ते एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेऊ शकतात. तसेच अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या हावभावाविषयी जाणून घेऊ शकता. तसेच या द्वारे तुम्ही स्वत:च्या किंवा इतरांबरोबर घडणाऱ्या घटनांविषयी जाणून घेऊन सतर्क राहू शकता.
अंकशास्त्रामध्ये मूलांक खूप महत्त्वाचा घटक आहे. अंकशास्त्रामध्ये एकूण १ ते ९ असे मूलांक असतात. मूलांक म्हणजे व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज. तुमची जर जन्मतारीख १० असेल तर १+० = १, तर तुमचा मूलांक १ असतो. मूलांकद्वारे आपण व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि भविष्याविषयी जाणून घेऊ शकतो. आज आपण मूलांक ४ विषयी जाणून घेणार आहोत.
मूलांक ४ असलेले लोक
ज्यो लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला झाला असेल तर त्या लोकांचा मूलांक हा ४ असतो.
मूलांक ४ असलेले लोक खूप कमी वयात यश मिळवतात आणि धनवान होतात. ते अतिशय मेहनती असतात आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळते. ते प्रचंड महत्त्वकांक्षी असतात. त्यांना आयुष्यात नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात.
या मूलांकच्या लोकांवर नेहमी लक्ष्मीची कृपा असते. त्यांना जीवनात कधीही पैशांशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत नाही. ते आयुष्यात मेहनतीच्या जोरावर भरपूर पैसा कमवतात आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम राहतात.
मूलांक ४ असलेल्या लोकांना पैशांची बचत कशी करावी, हे याविषयी माहिती असते. ते बजेटनुसार पैसा खर्च करतात. ते गुंतवणूक करून पैसा वाचवण्याचा प्रयत्न करतात.
या मूलांकच्या लोकांमध्ये खूप चांगली लीडरशीप क्वालिटी असते. ते प्रत्येक ध्येय खूप सहजपणे प्राप्त करतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असतो त्यामुळे व्यवसाय नोकरीच्या ठिकाणी ते खूप यशस्वी होतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)