ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हाही मूल जन्माला येते तेव्हा सर्वात आधी त्याचे नामकरण केले जाते आणि नाव देखील खूप विचारपूर्वक ठेवले जाते. असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीचं नाव त्याचे व्यक्तिमत्व दर्शवतं. इथे आपण त्या लोकांबद्दल बोलणार आहोत, जे कठोर परिश्रमाने जीवनात यश मिळवतात. तसेच, हे लोक बुद्धिमान आणि मल्टी-टॅलेंटेड असतात. जाणून घेऊया कोणती आहे ती अक्षरे…

A आणि N अक्षरे असलेले लोक:
या अक्षराने सुरू झालेल्या नावाची लोक खूप मेहनती आणि हुशार असतात. ते कठोर परिश्रमाने जीवनात यश मिळवतात. तसेच हे लोक मल्टी-टॅलेंटेड असतात. त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. तसंच, त्यांना हवं ते मिळू शकतं. त्यांना लवकर थकवा जाणवत नाही. त्यांच्या आत एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते जी त्यांना सतत सक्रिय ठेवते. समाजातही ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात.

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…

S आणि B अक्षरे असलेले लोक:
या अक्षराची लोक मनमिळाऊ आणि मेहनती असतात. हे लोक प्रत्येक परिस्थितीत स्वतःला साचेबद्ध करतात. ते कर्मावर अधिक विश्वास ठेवतात. हे लोक बहुगुणसंपन्नही असतात. तसेच, हे लोक त्यांच्या टॅलेंटने लोकांना वेड लावतात. समोरच्या व्यक्तीचा चेहरा वाचण्यातही हे लोक पटाईत असतात. हे अक्षर असलेले लोक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर काहीही साध्य करण्यास सक्षम असतात. ते स्वतःचे नशीब स्वतः बनवण्यावर विश्वास ठेवतात.

आणखी वाचा : वर्षभर ‘या’ राशींवर गुरुची राहील विशेष कृपा, करिअरसोबतच व्यवसायात मिळू शकते प्रचंड संपत्ती

M आणि Y अक्षरे असलेले लोक:
या अक्षराच्या नावाची लोक खूप मेहनती असतात. कष्ट आणि संघर्षाला ते कधीच घाबरत नाहीत. त्यांनी ठरवलेले काम ते पूर्ण समर्पणाने करतात. हे लोक स्वतःचा मार्ग निवडतात. त्यांना स्वातंत्र्य आवडते. तसंच ते स्पष्टवक्ते असतात आणि त्यांना काय म्हणायचे आहे ते समोरील व्यक्तीच्या तोंडावर बोलतात. त्यांच्या मनात काहीही होत नाही. हे लोक अनेक कौशल्यांमध्ये पारंगत असतात. त्यामुळे ते समाजातही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतात.