scorecardresearch

Pitru Paksha 2022: ‘या’ तारखेपासून सुरू होतोय पितृपक्ष पंधरवडा, जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

पितृपक्षात पितरांची पूजा, श्राद्ध आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अर्पण केले जाते.

Pitru Paksha 2022: ‘या’ तारखेपासून सुरू होतोय पितृपक्ष पंधरवडा, जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Pitru Paksha 2022 Date And Time : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. हा पितृपक्ष पूर्वजांना समर्पित आहे. तसेच पितृपक्षात पितरांची पूजा, श्राद्ध आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अर्पण केले जाते. वैदिक दिनदर्शिकेनुसार, दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमा आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपर्यंत असतो. यावर्षी पितृपक्ष शनिवार १० सप्टेंबरपासून सुरू होतोय आणि रविवार २५ सप्टेंबरपर्यंत चालेल. २५ सप्टेंबर रोजी पितृ अमावस्या साजरी होणार आहे. जाणून घेऊया श्राद्ध आणि अर्पण करण्याची पद्धत आणि महत्त्व…

श्राद्धाची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
हिंदू धर्मात पितृपक्षात पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी १५ दिवस ठेवण्यात आले आहेत. पितृपक्षामध्ये लोक आपल्या पितरांचे श्राद्ध करतात आणि असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. लोक त्यांच्या पूर्वजांचे ज्या दिवशी निधन झाले त्या तिथीला त्यांचे श्राद्ध करतात. या तिथीला ब्राह्मणांना भोजन दिले जाते. यासोबतच त्यांना यथाशक्ती दान-दक्षिणा दिली जाते. असे मानले जाते की जे पितरांचे श्राद्ध करत नाहीत त्यांना पितरांचा शाप लागतो आणि त्यांना पितृदोष प्राप्त होतो. त्यामुळे मुलाच्या जन्मात अडथळे येतात, लग्नातही अडथळे येतात. दुसरीकडे, जर पूर्वज तुमच्यावर प्रसन्न असतील तर तुमच्या प्रगतीत कोणताही अडथळा येत नाही.

आणखी वाचा : September Planet Gochar: सप्टेंबरमध्ये ३ ग्रहांच्या चालीमध्ये होणार बदल, या ४ राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या

गरुण पुराणानुसार ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध करत असाल. त्या दिवशी घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर पितरांचा फोटो लावून त्यांना फुलांचा हार घालून त्यांची पूजा करावी. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते.

महत्त्व आणि अर्पण करण्याची पद्धत…
गरुड पुराणानुसार, तुम्ही तुमच्या पूर्वजांचे नाव घेऊन दररोज अर्पण करू शकता. परंतु सर्व पितृ अमावस्येला अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही योग्य प्रकारे अर्पण करू शकत नसाल तर तुम्ही ते योग्य ब्राह्मणाकडून करून घेऊ शकता. यामध्ये हातात कुशाची अंगठी बनवली जाते. तसेच अर्पण करणाऱ्या व्यक्तीचे मुख दक्षिण दिशेला असावे.

आणखी वाचा : Chanakya Niti: कितीही प्रेम केले तरी पत्नी ‘या’ ५ गोष्टी लपवतात, ऐकून चकित व्हाल!

तसेच अर्पणमध्ये काळे तीळ, पांढरे चंदन, पांढरी फुले यांचा वापर केला जातो. शास्त्रात अर्पणचे ६ प्रकार सांगितले आहेत – ज्यामध्ये देव अर्पण, ऋषी अर्पण, दिव्य मानव अर्पण, दिव्य पितृ-अर्पण, यम-अर्पण आणि मानव-पितर अर्पण आहेत.

(टीप- इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या