Pitru Paksha 2025: यंदा पितृ पक्ष ७ सप्टेंबर रोजी सुरू होणार असून, २१ सप्टेंबर रोजी संपणार आहे. या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या काळात कुटुंबातील मृत व्यक्तींचे स्मरण करून, त्यांच्या नावाने श्राद्ध, पूजा केली जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. मात्र, या १५ दिवसांच्या काळात घरामध्ये कोणतही शुभ कार्य केले जात नाही. परंतु, जर पितृ पक्षाच्या काळात घरामध्ये मूल जन्माला आलं, तर अशा मुलाचं भाग्य कसं असेत, असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
पितृ पक्षात जन्मलेल्या मुलांना लाभतो पितरांचा आशीर्वाद?
- हिंदू मान्यतेनुसार या १५ दिवसांत जन्म घेणाऱ्या मुलांवर पितरांची विशेष कृपा असते. अशी मुलं आयुष्यात पुढे जाऊन प्रत्येक परीक्षेमध्ये यशस्वी होतात. पितृ पक्षामध्ये जन्माला आलेल्या मुलांना अत्यंत सौभाग्यशाली मानलं जातं.
- पितृ पक्षातील जन्मलेली मुलं इतरांच्या तुलनेत खूप समजूतदार, शांत असतात. वयाच्या तुलनेत ती लवकर सर्व गोष्टी आत्मसात करतात.
- ज्योतिषशास्त्राच्या मते, पितृ पक्षामध्ये जन्म घेणाऱ्या मुलांचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असतं. ती आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार असतात.
पितृ पक्ष म्हणजे काय?
भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंतच्या १५ दिवसांच्या काळात पितृ पंधरवडा म्हणजेच पितृ पक्ष केले जाते. पितृ पक्षाच्या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात. या काळात तर्पण, पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. पितृदोषापासून मुक्ती मिळावी म्हणून हा काळ खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती निधन पावली, तर आपण त्या व्यक्तीचं त्या तिथीला श्राद्ध करतो. मात्र, काही कारणानं हे श्राद्ध करणं राहून गेलं असेल, तर त्या कालावधीत ते केल्यास त्याच्या आत्म्याला शांती मिळते. या कालावधीत केलं जाणारं पिंडदान हे सर्वांत श्रेष्ठ दान असून, ते स्वर्गात असलेल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतं. हे पिंडदान सकाळी किंवा रात्री करीत नाहीत, तर ते माध्यान्हाला करणं योग्य मानलं जातं. याचं कारण म्हणजे या वेळात सावली मागच्या बाजूला पडते. या काळात ब्राह्मणांना दिलं जाणारं भोजन हेही चांगलं दान समजलं जातं. पितृ पंधरवड्यात आपले पूर्वज आपल्या आसपास असतात आणि ते आपल्यासोबत अदृश्यपणे राहत असतात, असंही म्हटलं जातं. यावेळी करण्याचे सर्व विधी दक्षिण दिशेला तोंड करून केले जातात. त्यामागेही शास्त्रीय कारण असल्याचे दिसते. दक्षिणायन आणि उत्तरायण अशी सूर्याभोवतीच्या पृथ्वी प्रदक्षिणेचे चक्र आपल्याला माही आहे. पृथ्वीवरील एक दिवस हा २४स तासांचा मानला गेला आहे; पण जे मृत झाले, त्या जीवांचा वर्षभराचा कालावधी म्हणजे एक दिवस, असे मानले जाते. उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस आणि दक्षिणायनाचा काळ ही देवांची रात्र, तसेच दक्षिणायन हा पितरांचा दिवस आणि उत्तरायण ही पितरांची रात्र असते, असं म्हटलं जातं.