Pitru Paksha Zodiac Signs: हिंदू धर्मात पितृपक्षाला खास महत्त्व आहे. पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो आणि आश्विन अमावास्येला म्हणजेच सर्वपितृ अमावास्येला संपतो. यावर्षी पितृपक्ष ७ सप्टेंबरला सुरू झाला असून २१ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. हा काळ पूर्वजांची आठवण काढण्याचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. या काळात लोक श्राद्ध, तर्पण आणि दान-पुण्य करतात.

ज्योतिषशास्त्रानुसार या काळात बारा राशींवर वेगवेगळा परिणाम दिसतो. त्यामुळे या काळात कोणत्या राशीवर काय परिणाम होईल आणि त्यांच्यासाठी कोणते उपाय उपयोगी ठरतील ते जाणून घेऊया.

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. या काळात कोणताही निर्णय विचार करून घ्यावा. या राशीच्या लोकांनी मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करावे आणि पितरांना लाल फुले अर्पण करावीत.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांच्या आर्थिक बाबींमध्ये चढ-उतार होऊ शकतात. कुटुंबात एखाद्या जुन्या विषयावर चर्चा होऊ शकते. या राशीच्या लोकांनी पांढऱ्या तीळाचे दान करावे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांच्या कामकाजात अडचणी येऊ शकतात आणि मानसिक ताण वाढू शकतो. या काळात हिरवे हरभरे, हिरव्या भाज्या दान कराव्यात. तसेच पितरांना तुळशीची पाने अर्पण करावीत.

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांचे या काळात खर्च वाढू शकतात. या राशीच्या लोकांनी सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करावे आणि कावळ्यांना अन्न द्यावे.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात त्यांना नशिबाची चांगला साथ मिळेल. रविवारी सूर्यदेवांना पाणी अर्पण करावे आणि गहू दान करावा.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. या काळात एखादी मोठी आनंदवार्ता मिळू शकते. गरजू मुलांना अन्न द्यावे आणि पितरांच्या नावाने दान करावे.

तूळ राशी (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांच्या वैवाहिक नात्यांमध्ये चढ-उतार येऊ शकतात. शुक्रवारी खिरीचा नैवेद्य द्यावा आणि लहान मुलींना अन्न द्यावे.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन संधी कमी मिळतील. मंगळवारी गूळ आणि मसूर डाळेचे दान करावे आणि दिवा लावा.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या विद्यार्थ्यांना आणि नोकरी करणाऱ्या लोकांना हा काळ फायद्याचा राहील. गुरुवारी पिवळी फुले आणि हरभऱ्याची डाळ दान करावी.

मकर राशी (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांच्या घरात लहानसहान वाद उद्भवू शकतात. नोकरीत ताण वाढू शकतो. शनिवारी तेलाचा दिवा लावा आणि गरजूंमध्ये काळा तीळ दान करा.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ नशीबवान ठरू शकतो. प्रवासातूनही फायदा होईल. शनिवारी शनीदेवाची पूजा करा आणि पाण्यात काळे तीळ घालून अर्पण करा.

मीन राशी (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांवर पितरांची विशेष कृपा राहील. अडकलेली काम पूर्ण होतील आणि आर्थिक फायदा होईल. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा आणि गायीला अन्न द्या.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)