Gajkesari Yog 2025: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. श्रावण महिना भगवान शिव शंकराला समर्पित आहे. शिवभक्त पूर्ण भक्तीभावाने आणि श्रद्धेने श्रावण महिन्यात शंकराची पूजा करतात. यंदाचा श्रावण महिना काही राशींकरता भाग्याचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे. कारण या काळात एक शक्तिशाली व दुर्मिळ राजयोग निर्माण होतोय, जो नवी नोकरी, पदोन्नती, सुख-संपत्ती आणि आकस्मिक धनलाभाचे संकेत देतोय.
ज्योतिषशास्त्रानुसार, २२ जुलै रोजी सकाळी ८:१४ वाजता चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार असून ते २४ जुलैपर्यंत तिथेच राहणार आहेत. याच दरम्यान, चंद्र आणि गुरु बृहस्पती यांची युती होऊन ‘गजकेसरी राजयोग’ तयार होतोय. ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा गुरू बृहस्पति म्हणजेच गुरू ग्रह आणि मनाचा कारक चंद्र हे एकाच राशीत असतात, तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. केंद्रस्थानी म्हणजेच लग्न, चौथे आणि दहाव्या स्थानी चंद्रासह गुरु ग्रहाची युती असेल तरी गजकेसरी राजयोग तयार होतो. या शुभ योगामुळे काही राशींना आयुष्यात सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात, या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत…
‘गजकेसरी राजयोग; ‘या’ लोकांचा सुरु होणार सुवर्णकाळ?
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या लोकांसाठी ही वेळ सोनेरी ठरणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. हाती घेतलेलं कार्य पूर्ण होऊ शकतील. या काळात व्यवसायात मोठ्या डील्स मिळू शकतात. या काळात तुम्हाला परदेशी प्रवास करण्याचे देखील योग जुळून येणार आहेत. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. घरात आनंदाचे वातावरण राहिल.
कन्या (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप शुभ ठरू शकतो. या राशींना अचानक धनलाभ, गुंतवणुकीतून फायदा, नोकरीत पदोन्नती, नवीन नोकरीची ऑफर यश-प्रगती मिळण्याची शक्यता आहे. या लोकांना वाहनसुखाचे योग दिसत आहेत. शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होईल, आणि जे लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्यासाठी योग्य स्थळं येण्याची शक्यता आहे. या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.
धनू (Sagittarius)
गजकेसरी राजयोगाची निर्मिती धनू राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत सापडू शकतात. या लोकांच्या भौतिक सुखात वाढ होऊ शकते. विवाह, वैवाहिक जीवन आणि सामाजिक जीवनात मोठे सकारात्मक बदल होऊ शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)