Rahu Budh Yuti 2024: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्याचा परिणाम मानवी जीवनावर खोलवर दिसून येतो. प्रत्येक ग्रह हा कोणत्या न कोणत्या राशीचा स्वामी ग्रह आहे, म्हणूनच ग्रहांची जेव्हा हालचाल होते तेव्हा त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. राहू ग्रह ७ मार्च २०२४ रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहेत आणि १८ महिने या राशीत राहणार आहेत. यातच बुध ग्रह असल्याने या दोन्ही ग्रहांचा संयोग मीन राशीत होईल. राहू आणि बुध यांच्या संयोगाने काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे. राहू आणि बुध यांच्या युतीमुळे १८ महिने काही राशींना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत या राशी…
‘या’ तीन राशींना आर्थिक लाभाचे योग?
वृषभ राशी
वृषभ राशीच्या धन घरामध्ये राहू आणि बुधाचा संयोग होणार असल्याने हा संयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकतो. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जुनी गुंतवणूक केली असेल तर त्यातून नफा मिळण्याची शक्यता आहे. संततीकडून चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : ५० वर्षांनंतर ‘दुहेरी नवपंचम राजयोग’ बनल्याने ‘या’ ३ राशी होणार धनवान? गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात… )
तूळ राशी
राहू आणि बुध यांचा संयोग तूळ राशीच्या सहाव्या घरात होणार आहे. हे संयोग २०२४ मध्ये तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. या काळात करिअरमध्ये प्रगतीसोबत यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली होण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. जुन्या आजारापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भागीदारीत काम करणाऱ्यांना मोठे यश मिळू शकते. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. सध्याच्या नोकरीत तुम्हाला बढती मिळू शकते.
कुंभ राशी
कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. त्यांचे बुध आणि राहू या दोघांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अशा स्थितीत बुध आणि राहूचा संयोग तुमच्यासाठी वरदानच ठरु शकतो. कुंभ राशीच्या लोकांना या काळात भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठी डील किंवा मोठी ऑर्डर मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात परदेश दौऱ्यावरही जाऊ शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)