Rahu Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहांची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. पंचांगानुसार, १८ मे रोजी राहूचा कुंभ राशीत प्रवेश झाला. राहू एका राशीत १८ महिने राहतो. त्यामुळे २०२६ पर्यंत राहू याच राशीत असेल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पाहायला मिळेल.

राहू देणार आनंदी आनंद

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे कुंभ राशीतील वास्तव्य खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या व्यक्तींना राहूचे कुंभ राशीतील वास्तव्य सकारात्मक फळ देणारे असेल. या काळात तुमच्या कुटुंबात आनंदी आनंद येईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप भाग्यकारी असेल. या काळात नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आहे.)