Rahu-Ketu Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांचे राशी परिवर्तन करण्यासाठी जवळपास १८ महिन्यांचा कालावधी लागतो. पंचांगानुसार, ३० ऑक्टोबर २०२३ पासून राहू मीन राशीत असून केतू ग्रह कन्या राशीत विराजमान आहेत. तसेच येत्या १८ मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी राहू वक्री चाल चालून कुंभ राशीत प्रवेश करेल आणि केतू ग्रह सिंह राशीत विराजमान होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

राहू-केतू या तीन राशींना करणार मालामाल

मिथुन (Gemini Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे राशी परिवर्तन खूप शुभ सिद्ध होईल. या काळात अनेक आनंदी वार्ता तुमच्या कानी पडतील. भाग्याची साथ मिळेल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.

वृषभ (Taurus Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूचे राशी परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होईल. तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. करिअरमध्ये हवे ते करता येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल.

कुंभ (Aquarius Rashi)

राहू-केतूचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)