Rahu Transit: मायावी आणि क्रूर ग्रह राहू शतभिषा नक्षत्राचा स्वामी आहे. १० वर्षांनंतर राहू पुन्हा आपल्या स्वतःच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी राहू शतभिषा नक्षत्रात गोचर करणार आहे. हे गोचर खूप महत्त्वाचं ठरणार आहे.
राहू ८ महिने शतभिषेत राहील
मायावी आणि वाईट प्रभाव देणारा राहू हा शतभिषा नक्षत्राचा स्वामी आहे. १० वर्षांनी राहू पुन्हा आपल्या शतभिषा नक्षत्रात जाणार आहे. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी राहू शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. हा बदल खूप महत्त्वाचा ठरेल.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
राहूचा शतभिषा नक्षत्रातील गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. मेहनतीचं फळ मिळेल. नोकरीत प्रगती होईल, व्यवसायात मोठे व्यवहार होतील. अडलेले काम पूर्ण होतील. जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील. मुलांबाबतची चिंता कमी होईल.
कर्क राशी (Cancer Horoscope)
राहूचा शतभिषा नक्षत्रात प्रवेश कर्क राशीच्या लोकांना मोठा फायदा देऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. पदोन्नती मिळू शकते. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
राहूचा नक्षत्र गोचर कुंभ राशीच्या लोकांना चांगला फायदा देऊ शकतो. यश आपोआप मिळेल. प्रेमजीवन चांगले राहील. लव्ह मॅरेज करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. काही मोठी शुभ बातमी मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
