Rajyog Effects on Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला ऐशोआराम, सुख, कला, श्रीमंती, पैसा, आणि संगीत यांचा कारक मानलं जातं. गुरु ग्रहाला समृद्धी, आध्यात्म, यश आणि ज्योतिष यांचा कारक मानतात. सूर्य देव हे सरकारी नोकरी, प्रशासन, वडील आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक मानले जातात.

नोव्हेंबर महिन्यात हंस, मालव्य आणि बुधादित्य राजयोग तयार होत आहेत. त्यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. अचानक धनलाभ आणि प्रगतीचे योग दिसत आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

मकर राशी (Capricorn Horoscope)

मालव्य राजयोग मकर राशीसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून कर्म स्थानात उच्च स्थितीत असतील, आणि सातव्या स्थानात हंस राजयोग तयार होईल.

या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते. त्यांचा प्रमोशन आणि पगारवाढही होऊ शकते.

व्यापार करणाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही हा काळ योग्य आहे. अजून अविवाहित असलेल्या लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

मालव्य, बुधादित्य आणि हंस राजयोग तयार झाल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण मालव्य राजयोग तुमच्या राशीपासून नवव्या स्थानात आणि हंस राजयोग सहाव्या स्थानात बनणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.

तुम्ही देश-विदेश प्रवास करू शकता. शत्रूंवर मात करण्यासाठी तुमची बुद्धी आणि योजना उपयोगी ठरेल. जुना गुंतवणूक किंवा एखाद्या अनोळख्या स्रोतातून तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तसंच या काळात तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभकार्याच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

कर्क राशी (Cancer Horoscope)

तुमच्यासाठी हे ३ राजयोग तयार होणं शुभ आणि फायदेशीर ठरू शकतं. कारण हंस राजयोग तुमच्या राशीच्या लग्न भावात आणि मालव्य राजयोग चतुर्थ भावात बनणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि व्यक्तिमत्त्वात चमक येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला भौतिक सुख-सुविधा मिळतील. वाहन किंवा प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखादी डील फायदेशीर ठरेल. तसंच या काळात आई आणि सासरकडच्या लोकांशी संबंध चांगले राहतील.