Mangal and Shani Yuti 2025: हिंदू धर्मामध्ये बहीण-भावाच्या नात्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळेच रक्षाबंधनाचा दिवस प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमाही साजरी केली जाते. यंदा रक्षाबंधनाचा सण ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार, या शुभ दिवशी ग्रहांचा देखील खास संयोग निर्माण होणार आहे ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींवर पाहायला मिळेल.

पंचांगानुसार, १३ जुलै रोजी शनी वक्री होणार असून सूर्यदेव १६ जुलै रोजी राशी परिवर्तन करतील. तसेच २८ जुलै रोजी मंगळ कन्या राशीत प्रवेश करेल. ९ ऑगस्ट रोजी मंगळ आणि अरूण एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील. ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. तसेच मंगळ आणि शनी एकमेकांपासून १८० डिग्रीवर असतील यामुळे प्रतियुती निर्माण होईल. या योगांचा १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर विशेष प्रभाव पाहायला मिळेल.

रक्षाबंधनाचा दिवस चार राशींसाठी लाभदायी

मेष (Mesh Rashi)

रक्षाबंधनाच्या दिवसापासून मेष राशीच्या आयुष्यात चांगल्या काळाची सुरूवात होईल. अविवाहितांसाठी विवाहाचा योग जुळून येईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.

वृषभ (Vrushabh Rashi)

रक्षाबंधनाच्या दिवसापासून वृषभ राशीसाठी अनुकूल काळ सुरू होईल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीसाठी हा काळ सकारात्मक बदल घडवून आणणारा असेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मनासारखी नोकरी मिळेल.या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. भौतिक सुख प्राप्त कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. आयुष्यात अनेक दिवसांपासून येणारे अडथळे दूर होतील. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)