Raksha Bandhan 2025 Muhurat Time: हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे एक विशेष महत्त्व आहे. त्यात रक्षाबंधन हा सण प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खास मानला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण घरोघरी मोठ्या थाटात आणि आनंदात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने बहीण आपल्या भावाच्या मनगटावर सुंदर राखी बांधून त्याला ओवाळते आणि गोड मिठाई भरवते. त्याच्या दीर्घायुष्य आणि सुखासाठी प्रार्थना करते. यावेळी बहिणीला भेटवस्तू देत, भाऊ तिच्या संरक्षणाची हमी देतो. भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते.
हिंदू दिनदर्शिकेनुसार, भाऊ-बहिणीतील पवित्र नाते जपणारा रक्षाबंधन हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. मात्र, नक्की कोणत्या तारखेला साजरे केले जाईल. तसेच या दिवशी भावाला राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त कोणते? आणि भद्रकाल नेमका किती तास असेल? याबाबत जाणून घेऊ…
रक्षाबंधन तिथी (Raksha Bandhan 2024 date and time)
पंचांगानुसार, रक्षाबंधनाचा सण श्रावण पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला साजरा केला जातो. उदय तिथीनुसार ९ ऑगस्ट २०२५ या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाणार असले तरी नारळी पौर्णिमेची तिथी आदल्या दिवशी ८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांपासून सुरू होईल; जी ९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून २४ मिनिटांनी समाप्त होईल.
रक्षाबंधन शुभ मुहूर्त (Raksha Bandhan 2024 Shubh Muhurat)
ब्राह्म मुहूर्त – सकाळी ४ वाजून २२ मिनिटांपासून ते ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत.
अभिजीत मुहूर्त – दुपारी १२ वाजून १७ मिनिटांपासून ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत.
सौभाग्य योग – पहाटे ४ वाजून ८ मिनिटांपासून ते १० ऑगस्टच्या मध्यरात्री २ वाजून १५ मिनिटांपर्यंत असेल.
सर्वार्थ सिद्धी योग – ९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून २३ मिनिटांपर्यंत असेल.
राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त (Raksha Bandhan shubh muhurat)
रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त ९ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होईल, जो दुपारी १ वाजून २४ मिनिटांपर्यंत राहील.
रक्षाबंधनाचा भद्रकाल आहे का? (Raksha Bandhan Bhadra kal)
भद्रकाल असलेल्या वेळेत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनाला भद्रकाल आर्वजून पाहिला जातो. पंचांगानुसार, यंदाचा भद्रकाल ८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी सुरू होणार असून, ९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजून ५२ मिनिटांनी संपेल.