Raksha Bandhan Muhurat: हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्याची पौर्णिमा तिथी ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ४३ मिनिटांनी सुरू झाली आहे. ही तिथी ९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजून २४ मिनिटांपर्यंत राहील. तर रात्री २ वाजून १५ मिनिटांपर्यंत सौभाग्य योग जुळून येईल. त्यामुळे उदया तिथीमुळे रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी दिवसभर साजरा केला जाईल.
यावर्षी ९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून २४ मिनिटांपर्यंत श्रवण नक्षत्र जागृत असणार आहे. त्यानंतर घनिष्ठा नक्षत्र सुरू होईल. तर आयुष्मान योग सकाळी ५ वाजून ५६ मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर दिवसभर सौभाग्य योग असेल.
या शुभ वेळेत राखी बांधणे अतिशय शुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया की रक्षाबंधन दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तात राखी बांधल्यास त्याचे दुप्पट फळ मिळते.
रक्षाबंधनला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त (Raksha Bandhan Muhurat 2025 in marathi)
ब्रह्ममुहूर्त: सकाळी ५ वाजून २९ मिनिटांपासून ते ६ वाजून ५ मिनिटांपर्यंत
सर्वात शुभ वेळ: सकाळी ६ वाजून ६ मिनिटांपासून ते ८ वाजून २० मिनिटांपर्यंत
विजय काळ: सकाळी १० वाजून ४७ मिनिटांपासून ते दुपारी ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत
अभिजीत मुहूर्त: दुपारी ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत
रक्षाबंधनला राखी बांधण्याची पद्धत (What is best time to tie Rakhi Today)
ज्योतिष शास्त्राचे तज्ञ पंडित धनंजय पांडे यांच्या मते, रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्यापूर्वी पूजेची थाळी सजवणे आवश्यक असते.
- या थाळीत राखी, हळद-कुंकू, अक्षता, मिठाई आणि एक दिवा ठेवावा.
- सर्वप्रथम ही थाळी आपल्या इष्टदेवाला अर्पण करून त्यांची पूजा करा. त्यानंतर थाळीतली पहिली राखी भगवान गणेशांना अर्पण करा.
- मग भावाला स्वच्छ जागेवर पूर्व दिशेला तोंड करून बसवा. यासोबतच भाऊ आणि बहीण दोघांनीही आपले डोके स्वच्छ कपड्याने झाकावे.
राखी बांधताना तीन गाठी मारण्याचे महत्व
राखी बांधताना भावाच्या कपाळावर तिळक लावा आणि थोडे अक्षत शिंपा, त्यानंतर राखी बांधा. राखी बांधताना त्यात तीन गाठी मारणे शुभ मानले जाते. ही परंपरा भावाच्या दीर्घायुष्य आणि समृद्धीची इच्छा दर्शवते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)