Raksha Bandhan Zodiac Sign Gifts For Sister : दिवसभर एकमेकांशी भांडतील; पण दुसऱ्याच क्षणाला एकमेकांना आई-बाबांपासून सांभाळूनसुद्धा घेतील, असा भाऊ-बहिणीचा हक्काचा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणाकडे श्रावणातील एक मुख्य उत्सव म्हणून पाहिले जाते. भावंडांनी एकमेकांचे कठीण काळात रक्षण करण्याबाबतची आठवण करून देणारे एक बंधन या दिवशी राखीच्या रूपात हातावर बांधले जाते. बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिच्या आवडीचे गिफ्ट देतो. अरेच्चा गिफ्टवरून आठवलं की, तुम्ही तुमच्या बहिणीसाठी रक्षाबंधनचे गिफ्ट घेतले का? नाही… तर आम्ही तुमच्यासाठी गिफ्टची यादी घेऊन आलो आहोत.

सहसा आपण रक्षाबंधनाला साडी, मेकअपचे सामान, मोबाईल कव्हर, बॅग, चॉकलेट, मिठाई आदी ठरलेल्या गोष्टी भेट म्हणून देतो. पण, यंदा आपण राशीनुसार कोणतं गिफ्ट तुमच्या बहिणीला दिले पाहिजे हे जाणून घेणार आहोत…

मेष (Aries)

मेष राशीच्या मुली धाडसी, उत्साही व लेडी बॉस असतात. त्यामुळे तुम्ही त्यांना बॉक्सिंग ग्लोव्हज, जिम मेंबरशिप किंवा त्यांच्या आवडीची वस्तू म्हणून ठळक लाल रंगाच्या हील्स गिफ्ट म्हणून देऊ शकता.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या मुलींना आरामदायक गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही या मुलींना सुंदर झगा, स्किनकेअर किंवा सुगंधित मेणबत्ती द्या.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या मुलींचा मेंदू संगणकासारखा कार्यक्षम असतो. तुम्ही रक्षाबंधनाच्या सणाला त्यांना एक जर्नल, वायरलेस इअरबड्स किंवा एखादा व्हिडीओ गेम भेटवस्तू म्हणून दिलात, तर त्यांना सतत उत्साहित राहण्यास आणखीन मदत होईल.

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या मुली खूप भावनिक असतात. त्यामुळे एक कस्टम फोटो फ्रेम किंवा स्वतःच्या हाताने एक पत्र लिहून तुम्ही तिला द्या.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या बहिणीला तुम्ही दागिने, ब्रँडेड बॅग किंवा ट्रेंडी जॅकेट, टॉप अशा काही वस्तू भेट म्हणून देऊ शकता.

कन्या (Virgo)

सजवलेला हर्बल टीचा एखादा सेट, तिच्या नावाच्या अक्षराचा एक सुंदर हार किंवा नेकलेस, पेंडंट तुम्ही कन्या राशीच्या भगिनीला गिफ्ट म्हणून देऊ शकता. तुम्ही तिच्यासाठी काय खरेदी केलं आहे यापेक्षा तिची आवड लक्षात ठेवून आणलेलं गिफ्ट तिच्या चेहऱ्यावर आनंद देऊन जाईल.

तूळ (Libra)

एक सुंदर आरसा, स्टायलिश बॅग किंवा पेस्टल मेकअप सेट तुम्ही तूळ राशी असणाऱ्या बहिणीला देऊ शकता.

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीला गोपनीयता आवडते. तिला कस्तुरीसारखा परफ्यूम, सिल्क स्लीपवेअर आणि वाइन-टोन असलेली लिपस्टिक द्या.

धनू (Sagittarius)

धनू राशी असणाऱ्या तुमच्या उत्साही बहिणीला तुम्ही ट्रॅव्हल पाऊच, बॅकपॅक किंवा एक ट्रिप व्हाउचरसुद्धा देऊ शकता.

मकर (Capricorn)

जेड रोलर सेट, स्टायलिश गोल्ड हूप्स (कानातले) किंवा एक सुंदर घड्याळ भेट द्या.

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या बहिणीला ब्ल्यूटूथ स्पीकर, एलियन्सबद्दलचे पुस्तक किंवा क्वांटम फिजिक्स भेट म्हणून द्या.

मीन (Pisces)

स्वप्नाळू आणि भावनिक स्वभाव असणाऱ्या या राशीच्या मुलींसाठी तुम्ही सुगंधित मेणबत्त्या, पेस्टल वॉटर कलर्स किंवा चंद्राच्या आकाराचा स्टायलिश दिवा भेट म्हणून द्या.

तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बहिणीची राशी जाणून घेऊन, तिला खास वस्तू भेट म्हणून देऊ शकता.