Shani Mangal Yog: भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण, रक्षाबंधन, एक विशेष ज्योतिषीय योगायोग घेऊन येत आहे. ९ ऑगस्ट रोजी शनी आणि मंगळ एक दुर्मिळ संयोग घडवत आहेत. सध्या शनी मीन राशीत आहे आणि मंगळ कन्या राशीत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ०८:१८ वाजता, मंगळ आणि शनी १८० अंशांच्या अंतरावर असतील, ज्याला ज्योतिषशास्त्रात ‘प्रत्युती’ म्हणतात. सामान्यतः प्रतियुती चांगली मानली जात नाही आणि ती संघर्ष आणि आव्हाने आणते.पण यावेळी ही परिस्थिती ३ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे. जाणून घ्या या कोणत्या भाग्यवान राशी आहेत.
मेष राशी
मेष राशीसाठी, रक्षाबंधनाच्या दिवशी शनी आणि मंगळाचे संयोजन करिअरमध्ये सकारात्मक बदल आणेल. तुमच्या जीवनात गती येईल. तुम्हाला पदोन्नती मिळू शकेल. व्यावसायिकांनाही फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. समाजात आदर वाढेल.लोक तुमची प्रशंसा करतील.व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. पैशांशी संबंधित समस्या दूर होतील आणि नशीब तुम्हाला प्रत्येक कामात साथ देईल. शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचे व्यक्तिमत्व मजबूत होईल आणि तुमचा आत्मविश्वास उंच राहील.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा काळ आरोग्यात सुधारणा आणेल. काही काळापासून सुरू असलेल्या शारीरिक समस्या आता दूर होतील. कुटुंबात आनंद राहील. शुभ कार्य होऊ शकते. आर्थिक लाभ होईल. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभाचे योग दिसत आहेत. पैशाशी संबंधित बाबींमध्ये, विशेषतः शेअर्स किंवा गुंतवणुकीत नफा होईल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील. तुम्हाला वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील.
मीन राशी
रक्षाबंधनाच्या दिवशी शनि आणि मंगळ मीन राशीला खूप फायदा देऊ शकतात. साडेसातीचे दुःख कमी होईल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळू शकेल. तुम्ही आनंददायी प्रवासाला निघू शकाल. तुम्ही आतून मजबूत असाल आणि मोठे यश मिळवू शकाल.आज सामाजिक पातळीवर तुमचे कौतुक होऊ शकते. तुम्हाला काही सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल.