Raksha Bandhan Shubh Muhurta: भाऊ-बहिणीच्या प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक असलेला रक्षाबंधन सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जातं. यंदा रक्षाबंधन ९ ऑगस्टला आहे. या वर्षीची राखी खास मानली जाते कारण सुमारे १०० वर्षांनी असं होणार आहे की या दिवशी पंचक आणि भद्राचा काळ नाहीये. याशिवाय अनेक शुभ योगही बनत आहेत. अशा शुभ संयोगात काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया की रक्षाबंधनचा दिवस कोणत्या राशींसाठी लकी ठरू शकतो.
१०० वर्षांनंतर रक्षाबंधनाला दुर्मीळ योग (Raksha Bandhan Shubh Muhurat)
पंचांगानुसार, यंदा रक्षाबंधनला ना भद्रा आहे ना पंचक. त्याचबरोबर श्रवण नक्षत्र आणि चंद्र-सूर्याचं हे संयोजन १०० वर्षांत एक खूपच दुर्मीळ योग आहे. असा योग शेवटचा ४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला होता, जेव्हा भद्रा सकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी संपली होती. या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी सूर्य-शनी नवपंचम योग, मंगळ-शनी प्रतियुति योग, समसप्तक योग आणि मिथुन राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. याशिवाय मंगळ आणि राहू मिळून षडाष्टक योगही बनवत आहेत.
मकर राशी (Capricorn Zodiac Sign)
या राशीत चंद्र विराजमान असतील. गजलक्ष्मी योगासोबत इतर शुभ योगही फायदा देऊ शकतात. भाऊ-बहिणीचं नातं मजबूत होऊ शकतं. जीवनात आनंद येऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ जाऊ शकतो. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबतचे हे क्षण खास आणि लक्षात राहणारे ठरतील. शारीरिक आणि मानसिक तणावातून सुटका मिळू शकते. नोकरी आणि व्यवसायातही चांगला फायदा होण्याचे योग आहेत. अचानक पैसे मिळण्यासोबतच एखादी मोठी आनंदाची बातमीही मिळू शकते.
धनु राशी (Sagittarius Zodiac Sign)
या राशीच्या लोकांना देखील चांगला फायदा होऊ शकतो. ही देवगुरुची रास असल्यामुळे त्यांचा प्रभाव जास्त राहू शकतो. परदेशातून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाऊ शकतो. नोकरीत पदोन्नती आणि पगार वाढीचे योग आहेत. भाऊ-बहिणींसोबतही चांगला वेळ जाईल. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. याशिवाय प्रवासाचे योगही तयार होत आहेत.
मीन राशी (Pisces Zodiac Sign)
या राशीत शनी वक्री अवस्थेत आहे. त्याचसोबत मंगळाची दृष्टि पडत असल्यामुळे समसप्तक योग आणि शनी-सूर्य नवपंचम राजयोग लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांचे जुने प्रश्न संपण्याची शक्यता आहे. व्यवसायातही चांगला फायदा होणार आहे. व्यापारात भरपूर नफा होऊ शकतो. गुरूची विशेष कृपादृष्टि राहणार आहे, त्यामुळे भाऊ किंवा बहिणीकडून आर्थिक मदत मिळू शकते. लग्नाच्या योग्य वयात असलेल्या बहिणीसाठी चांगलं स्थळ येऊ शकतं.