Budh Uday in August: ९ ऑगस्टला, म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी, बुध कर्क राशीत उदयाला येणार आहे. बुधाच्या उदयामुळे या तीन राशींना मोठा फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ या भाग्यवान राशींबद्दल.
ग्रहांच्या युवराज बुधला शिक्षण, व्यापार, बुद्धी, वादविवाद, अर्थव्यवस्था, शेअर बाजार, एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता यांचा कारक मानले जाते. त्यामुळे बुधाच्या स्थितीतला थोडासाही बदल १२ राशींवर आणि देश-विदेशावर परिणाम करतो.
वैदिक ज्योतिषानुसार, बुध २४ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजून ४२ मिनिटांनी चंद्राची रास कर्कमध्ये अस्त झाली आहे आणि ९ ऑगस्टला, म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी, त्याच राशीत उदयाला येईल.
मेष राशी (Today Aries Horoscope)
बुधाचा उदय या राशीच्या लोकांसाठी अनेक क्षेत्रांत फायदेशीर ठरू शकतो. या राशीत बुध चतुर्थ भावात उदयाला येत आहे. त्यामुळे चतुर्थ भावामुळे या राशीच्या लोकांना प्रारंभीच्या शिक्षणात चांगला फायदा मिळू शकतो. बुध अस्त असल्यामुळे तुमच्या जीवनातील चालू अडचणी किंवा समस्या आता सुटू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. शिक्षणाच्या क्षेत्रातही चांगला लाभ मिळू शकतो. ज्यांचं अभ्यासात मन लागत नव्हतं, त्यांना बुधाच्या उदयामुळे फायदा होईल. एकाग्रता वाढेल, ज्यामुळे त्यांचं मन अभ्यासात जास्त लागेल. जमीन-जुमल्यासंबंधीच्या प्रकरणांत तुम्हाला यश मिळू शकतं.
मिथुन राशी (Today Gemini Horoscope)
या राशीच्या कुंडलीत लग्न आणि चौथ्या भावाचे स्वामी असलेले बुध या राशीच्या दुसऱ्या भावात उदयाला येत आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत मोठं यश आणि धनलाभ मिळू शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूप फायदेशीर ठरू शकते. घर-परिवारातील चालू समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. आता तुम्ही आरामदायी जीवन जगू शकता. कपडे किंवा दागिने खरेदी करू शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यापारात तुम्ही आखलेली योजना यशस्वी ठरू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठीही ही वेळ खूप फायदेशीर ठरू शकते. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल आणि पदोन्नतीसोबतच एखादी मोठी जबाबदारीही दिली जाऊ शकते.
कन्या राशी (Today Virgo Horoscope)
या राशीच्या कुंडलीत लग्न आणि कर्मभावाचे स्वामी असलेले बुध लाभभावात उदयाला येत आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. बराच काळ सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्या बुधाच्या उदयामुळे संपुष्टात येऊ शकतात. कर्मस्थानात उदयाला आल्यामुळे बुध तुम्हाला कामाच्या क्षेत्रात चांगला लाभ देऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी पगारवाढीसोबत पदोन्नतीची शक्यता आहे. व्यापारातही चांगला फायदा होऊ शकतो. भावंडांसोबत चांगला वेळ जाईल. मुलांकडून काही आनंदाची बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग उघडतील आणि भविष्यासाठी पैसा साठवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)