Ram Navami 2024 Date Tithi And Shubh Muhurat : रामनवमी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाचा जन्म झाला होता. रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस मानला जातो. चैत्र नवरात्रीची सांगता रामनवमीने होते. रामनवमीला भगवान रामाची विशेष पूजा आणि उपासना केली जाते. या दिवशी प्रभू राम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची पूजा केली जाते. रामनवमीचा शुभ मुहूर्त, तिथी व पूजा पद्धत जाणून घेऊ.

राम नवमी तिथी २०२४ (Ram Navami 2024: Date)

वैदिक दिनदर्शिकेच्या गणनेनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी १६ एप्रिल रोजी दुपारी ०१.२३ पासून सुरू होईल. १७ एप्रिल रोजी दुपारी ०३.१५ वाजता नवमी तिथी समाप्त होईल. अशा परिस्थितीत उदय तिथीच्या आधारे १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमीचा सण साजरा केला जाणार आहे.

Chaitra Navratri Maha Ashtami Rare Yog Siddhi & Ravi To Make These 5 Rashi Extremely Rich
आज महाअष्‍टमीपासून वर्षभर ‘या’ ५ राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी; सिद्धी व रवी योग तुमच्या राशीला काय देणार?
16th April Panchang rashi bhavishya these zodiac signs Wishes will be fulfilled Aries to Min signs Daily marathi horoscope
१६ एप्रिल पंचांग: इच्छा होतील पूर्ण, हातात येतील नवीन अधिकार; वाचा मेष ते मीन राशींचा कसा असेल मंगळवार ?
Shani Vakri 2024
३६५ दिवस ‘या’ ४ राशींना शनिदेव करणार मालामाल? शनि जूनमध्ये वक्री अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती
Hanuman Jayanti Wishes 23rd April Rashi Bhavishya Mesh To Meen
हनुमान जयंतीला मारुतीराया मेष ते मीनपैकी कुणाला देणार आर्थिक बळ; तुमच्या राशीच्या नशिबात आज काय घडेल?

Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व

रामनवमी शुभ मुहूर्त २०२४ (Ram Navami 2024: Timings and Shubh Muhurat)

या वर्षी राम नवमीला भगवान श्रीरामाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त १७ एप्रिल रोजी सकाळी ११.१० ते दुपारी १.४३ पर्यंत असेल. अशा प्रकारे रामनवमीच्या पूजेसाठीच्या शुभ मुहूर्ताची वेळ दोन तास ३३ मिनिटे इतकी असेल.

राम नवमी माध्यान्ह वेळ – १२.२०
विजय मुहूर्त – दुपारी ०२.३४ ते ०३.२४ पर्यंत
गोधुली मुहूर्त – संध्याकाळी ०६.४७ ते ०७.०९ पर्यंत.

राम नवमी पूजा विधी २०२४ (Ram Navami: Puja Vidhi)

रामनवमी हा सण हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. भारतासह जगातील काही देशांमध्ये मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्नान करीत, स्वच्छ कपडे परिधान केले जातात. त्यानंतर पूजास्थान स्वच्छ केल्यावर भगवान रामाची पूजा केली जाते. त्यानंतर भगवान रामाच्या पूजेमध्ये विविध फळे, मिठाई, फुले अर्पण केली जातात. त्यानंतर आपल्या इच्छेनुसार रामचरितमानस, रामायण व रामरक्षा स्तोत्राचे पठण करू शकता. शेवटी प्रभू राम, माता सीता व हनुमान यांची आरती करून, पूजा पूर्ण केली जाते. पूजेनंतर सर्व प्रसादाचे वाटप केले जाते.

रामनवमीचे महत्त्व (Ram Navami 2024: Significance Of This Festival)

रामनवमीचा सण दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान रामाचा जन्म विष्णूचा सातवा अवतार म्हणून झाला होता. वैदिक दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी भगवान रामाचा जन्म अयोध्येचा राजा दशरथ यांचा मोठा मुलगा म्हणून झाला. धार्मिक मान्यतेनुसार रामाचा जन्म रावणाला मारण्यासाठी झाला होता. या कारणास्तव रामनवमी हा सण दरवर्षी प्रभू रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो आणि वाईटावर चांगल्याचा विजय होतो.

वैदिक दिनदर्शिकेनुसार रामनवमी हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी येतो आणि तो चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवसही असतो. या दिवशी देशभरात शक्तीची पूजा करून रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशभरात ठिकठिकाणी धार्मिक मिरवणुका काढल्या जातात. तसेच मंदिरांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत भजन-कीर्तन आणि धार्मिक विधी केले जातात.