आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा विवाह १४ एप्रिल रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार झाला. लग्नात जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. या सोहळ्यात भावाची भूमिका महत्त्वाची असते. आलियाचा भाऊ विधी दरम्यान उपस्थित होता आणि प्रत्येक गोष्टीचं बारकाईने बघत होता. इंडिया टुडेशी बोलताना आलियाचा भाऊ राहुल भट्टने सांगितले की, रणबीर आणि आलियाने अग्निभोवती सात नव्हे तर केवळ चार फेऱ्या मारल्या. कपूर कुटुंबातील जुन्या पंडितांनी हे लग्न केले आणि त्यांनीच आलिया आणि रणबीरला चार फेऱ्या मारायला लावल्या. यानंतर त्यांनी प्रत्येक फेरीची महत्त्व समजवून सांगितलं. याबाबत टॅरो कार्ड रीडर जीविका शर्मा यांनी या चार फेऱ्यांचे महत्त्व सांगितले.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना टॅरो कार्ड रीडर जीविका शर्मा यांनी सांगितले की, कोणताही विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार होत असेल तर वधू-वरांना किमान चार फेऱ्या अग्निभोवती माराव्या लागतात. तसेच प्रत्येक फेरीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. तसेच, या फेऱ्या जीवनाच्या चार उद्दिष्टांशी संबंधित आहेत. १- धर्म २- अर्थ ३- काम ४- मोक्ष.
१- धर्म: हा फेरा धार्मिकतेची भावना आणि निष्ठेने धर्माचे पालन करण्याचे कर्तव्य दर्शवितो.
२- अर्थ: जीविका शर्मा यांनी सांगितले की, दुसरी फेरी चांगली उपजीविका आणि श्रीमंत असल्याचे म्हटले जाते. तसेच, आपण सक्षम असल्यास, आपण गरीब आणि गरजूंना देखील मदत करावी.
३- काम: हिंदू पौराणिक कथेनुसार, काम ही प्रेमाची देवता आहे. अशा प्रकारे हा फेरा विवाहित जोडप्यासाठी प्रेम आणि समर्पण दर्शवतो. एकमेकांना साथ व सहकार्य करावे तसेच प्रत्येक सुख-दु:खात एकमेकांच्या पाठीशी उभे राहावे असे जीविका शर्मा यांनी सांगितले.
Hindu Wedding: हिंदू विवाहात ७ फेरे का घेतले जातात? जाणून घ्या कारण
४- मोक्ष: मोक्ष हा शेवटचा फेरा आहे, दुःखापासून मुक्तीचे प्रतीक आहे. एखाद्या व्यक्तीने एकदा लग्न केले आणि वैवाहिक जीवनातील सुखाचा आनंद घेतला की, तो अविवाहित जीवनातील दुःखातून मुक्त होतो.
जीविका शर्मा यांनी सांगितले की, किमान चार फेऱ्या घेणे आवश्यक आहे, परंतु लोक क्वचितच चार फेऱ्या मारतात. परंतु सनातन धर्म आणि आर्य समाजाच्या चालीरीती आणि परंपरांमध्ये फेऱ्यांची संख्या ७ निश्चित केली आहे.