17th October Rashi Bhavishya & Panchang : आज १७ ऑक्टोबर २०२४ रोजी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. पौर्णिमा तिथी आज दुपारी ४ वाजून ५६ मिनिटांपर्यंत राहील. गुरुवारी हर्ष योग रात्री १ वाजून ४२ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच रेवती नक्षत्र आज दुपारी ४ वाजून २० मिनिटांपर्यंत जागृत असेल. तर राहू काळ दुपारी १ वाजून ३० मिनिटांपासून सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असेल. त्याशिवाय आज नवान्न पौर्णिमा आहे. बदलत्‍या परिस्थितीमध्येही नवान्न पौर्णिमाची परंपरा आजही कोकणात पाळली जात आहे.तर आज मेष ते मीनचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

१७ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- मानसिक चलबिचलता राहील. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. सामाजिक भान राखून वागाल. कार्यक्षेत्रात वाढीव अधिकार प्राप्त होतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.

वृषभ:- जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरात आनंदी वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठांचा सल्ला व मत उपयोगी पडेल.

मिथुन:- जवळच्या नातेवाईकांशी गप्पा होतील. कलेला चांगले प्रोत्साहन मिळेल. मान-सन्मान प्राप्त होतील. आनंदाची अनुभूति घ्याल. कामाच्या स्वरुपात काही क्षुल्लक बदल करावे लागतील.

कर्क:- पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. अति तिखट पदार्थ टाळा. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. नवीन ओळखीतून चांगला लाभ होईल. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

सिंह:- आपली चांगली वर्तणूक लोकांना आकर्षित करेल. त्यातूनच समाधान लाभेल. जवळच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. टीमवर्क यशस्वी रित्या पार पाडाल. समस्यांचे निराकरण करता येईल.

कन्या:- लोकांशी बोलताना आपले विचार पक्के ठेवा. आपले मुद्दे ठामपणे मांडा. कोणत्याही वादात अडकू नका. वातावरण अनुकूलतेसाठी प्रयत्न करावेत. महिला सहकार्‍याकडून मदत मिळेल.

तूळ:- आपली एखादी चुकही मान्य करावी लागेल. निष्काळजीपणा कमी करा. ज्येष्ठ व्यक्तींच्या भेटीचे योग. कामातून काहीनाकाही लाभ मिळेल. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्या.

वृश्चिक:- कामातील ताणाचे योग्य नियोजन करावे. अतिरिक्त भर घेऊ नका. एखाद्या गोष्टीत माघार घ्यावी लागू शकते. तज्ञांच्या मतावर विश्वास ठेवून काम करावे. आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडू शकाल.

धनू:- कामाचा उरक वाढवा. मुलांकडून लाभ होतील. जुनी देणी फेडू शकाल. कामात आपले मत विचारात घेतले जाईल. आवश्यक गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

मकर:- समोरील व्यक्ति आपला निर्णय मान्य करेल. हुशारीने वागावे. प्रवास लाभदायक ठरतील. जुन्या मित्रांशी संवाद साधता येईल. कर्जाऊ व्यवहार टाळावेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभ:- जोडीदाराच्या मदतीने अडकलेली कामे पुढे न्याल. दिवस मजेत जाईल. अनावश्यक खर्च टाळावेत. बोलताना शब्द जपून वापरावेत. गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल.

मीन:- लोकांवर अति अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्यावे. संपत्तीत वृद्धी होऊ शकेल. काही कारणास्तव प्रवास करावा लागेल. कोणत्याही गोष्टीत अति घाई करू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर