Grah Gochar November 2025: नोव्हेंबर महिना दारात उभा आहे आणि या महिन्याचं आगमनच काही राशींच्या लोकांसाठी नवीन दिशा आणि संधी घेऊन येणार असल्याचं ज्योतिषशास्त्र सांगतं. कारण- या महिन्यात आकाशात ग्रहांच्या मोठ्या हालचाली होणार आहेत. या बदलांमुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस सुरू होऊ शकतात. चला जाणून घेऊया, कोणत्या तीन राशींच्या लोकांच्या भाग्याचा पारा नोव्हेंबरपासून वाढणार आहे आणि त्यांना कोणत्या क्षेत्रांत मिळू शकतो लाभ..
ग्रहांची मोठी उलथापालथ
नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ग्रहांच्या हालचाली वेगाने सुरू होतील.
- २ नोव्हेंबरला चंद्र मीन राशीत प्रवेश करणार असून, त्याच दिवशी शुक्र तूळ राशीत प्रवेश करील.
- १० नोव्हेंबरला बुध वृश्चिक राशीत वक्री होईल आणि त्यानंतर ११ नोव्हेंबरला गुरू कर्क राशीत उलट्या चालीने भ्रमण करेल.
- १६ नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करील, २३ नोव्हेंबरला बुध तूळ राशीत गोचर करील आणि २९ नोव्हेंबरपर्यंत तोच वक्री राहील.
- महिन्याच्या शेवटी म्हणजे ३० नोव्हेंबरला शनी मीन राशीत मार्गस्थ होईल.
हे सर्व बदल काही राशींसाठी नवे दरवाजे उघडतील, तर काहींसाठी नव्या संधी घेऊन येतील.
१. तूळ
नोव्हेंबर महिना तूळ राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास आणि प्रगती घेऊन येईल, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूनं काम करू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचं कौतुक होण्याची शक्यता आहे. बराच काळ अडकलेले प्रकल्प आता गती घेतील. आर्थिकदृष्ट्या काही सकारात्मक हालचाली झाल्याचे दिसू शकते. घरगुती वातावरण प्रसन्न राहील आणि काहींना कौटुंबिक आनंदाचे प्रसंगही लाभतील. एकट्यानं जीवन जगणाऱ्यांसाठी हा काळ विशेष असू शकतो. एखादी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. हा काळ स्वतःला नवी ऊर्जा देणारा, आत्मविश्वास वाढविणारा ठरू शकतो.
२. वृश्चिक
नोव्हेंबर महिना हा वृश्चिक राशीसाठी खूप शुभ काळ ठरू शकतो, असं ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून म्हटलं जातं. ग्रहांची चाल या राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ देऊ शकते. कला, मीडिया, ग्लॅमर किंवा सौंदर्याशी संबंधित क्षेत्रात असणाऱ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. समाजात तुमचं स्थान अधिक मजबूत होईल आणि लोकांचा विश्वास वाढेल. नातेसंबंधात गोडवा येईल; जुन्या गैरसमजुती मिटतील. आर्थिक स्थिती सुधारेल, काहींसाठी नवीन कमाईचे मार्गही खुलतील. एकंदरीत, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना नाव, ओळख आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरू शकतो.
३. कुंभ
नोव्हेंबर महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी बदलांचा, पण सकारात्मक बदलांचा काळ ठरू शकतो. करिअरमध्ये मोठा निर्णय तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. दीर्घकाळ चाललेल्या प्रयत्नांना आता यशाची साथ मिळू शकते. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील आणि पालकांचा पाठिंबा मिळेल. आरोग्य आणि मानसिक स्थैर्य दोन्ही सुधारेल. हा काळ तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक मजबूत करणारा आणि भविष्याबद्दल आत्मविश्वास देणारा ठरू शकतो. मोठा धनलाभ या काळात होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
