Samurdrik Shastra Meaning: ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या सवयी आणि शारीरिक हालचाली पाहून स्वभावाविषयी माहिती देणाऱ्या विद्येला सामुद्रिक शास्त्र असे संबोधले जाते. पौराणिक संदर्भ पाहिल्यास समुद्र नामक ऋषींनी या सामुद्रिक शास्त्र ग्रंथाची रचना केली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामुद्रिक शास्त्र हे तुमच्या शरीरावरील कोणतेही चिन्ह शुभ किंवा अशुभ मानत नाही पण त्या प्रत्येक चिन्हांमागील अर्थ व त्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे काम करते.आज आपण याच शास्त्राच्या माध्यमातून आपल्या चेहऱ्यावरील निशाण नेमकं आपल्या स्वाभावाविषयी काय सांगतात हे पाहणार आहोत. चला तर मग…
चेहऱ्यावर निशाण
चेहऱ्यावर तिळापेक्षा किंचित मोठ्या आकाराचं निशाण असणारी लोकं ही अत्यंत इमोशनल असल्याचे मानले जाते. असं असलं तरीही ही मंडळी व्यवहारातही तितकीच तरबेज असतात, त्यांचा बोलका स्वभाव त्यांना अनेकदा अडचणीतून बाहेर काढू शकतो. अशी मंडळी राजेशाही आयुष्य जगू शकतात, कदाचित आता त्यांची परिस्थिती सधन नसेल मात्र त्यांच्या सवयी राजेशाही दिसून येतात असे सामुद्रिक शास्त्र सांगते.
कपाळावर निशाण
जर कपाळावर काही चिन्ह किंवा बर्थ मार्क असेल तर ही मंडळी समाजात स्वतःसाठी काहीतरी वेगळे स्थान निर्माण करू इच्छितात, करियरमध्ये यांना नेहमीच इतरांपेक्षा वेगळा मार्ग निवडायचा असतो. व्यवहारात त्यांना प्रत्यक्ष समज असेलच असे नाही मात्र पैसे कमावण्याच्या स्मार्ट पद्धती यांना ओळखता येतात. अशा मंडळींची लोकप्रियता खूप असते, कदाचित यामुळेच त्यांना चार जणांच्या गटात वेगळं मत मांडण्याची सवय असते.
मानेवर निशाण
एखाद्याच्या मानेवर बर्थ मार्क असेल तर हे त्यांचे प्रवासप्रेम दर्शवतात. अशा मंडळींना आपल्या नियमाने काम करायला आवडते. यांची दूरदृष्टी उत्तम व बुद्धी तल्लख असू शकते. एखाद्याच्या मानेच्या मागील बाजूस असणारा बर्थ मार्क असेल हा शांत स्वभाव दर्शवतो. अत्यंत कठीण परिस्थितीतही ही मंडळी शांत असतात पण जरी शांत स्वभाव असला तरी या मंडळींचा राग अनावर झाल्यास त्यांना सांभाळणे कठीण असते.
Samudrik Shastra: झोपण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव; पोटावर झोपणारे बिनधास्त तर पाय दुमडून..
गालावर निशाण
जर एखाद्याच्या गालावर बर्थ मार्क असेल तर याचा अर्थ अशा व्यक्तींना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागू शकतो मात्र या संघर्षाचे गोड फळ लाभू शकते. या मंडळींकडे धन संचय असेल असे नाही, भौतिक सुखाचा लाभ घेणे यांना शक्य होईलच असे नाही पण या मंडळींचा स्वभाव समाधानी असतो.
शनिने मार्गी होत साकारला दुर्मिळ ‘महापुरुष राजयोग’; ‘या’ राशींना अनपेक्षित धनलाभ व प्रगतीची प्रबळ संधी
ज्या महिलांच्या दोन्ही गालांवर निशाण असते अशा महिलांचे नशीब लग्नांनंतर चमकण्याची शक्यता असते. या महिलांना वैवाहिक सुखामुळे आकाश ठेंगणे झाल्याचे भासू शकते.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)