Sankashti Chaturthi May 2023: हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. वर्षामध्ये २४ चतुर्थी येतात. यानुसार, प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. पहिली कृष्ण पक्षामध्ये येते जिला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते तिला विनायक चतुर्थी म्हणतात. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी गणेशाची विधिवत पूजा आणि व्रत करण्याची पद्धत आहे. या दिवशी गणपतीची पूजा करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता मिळते आणि प्रत्येक प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. चला संकष्टी चतुर्थीची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी

ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. पंचांगानुसार, चतुर्थी ८ मे २०२३ रोजी संध्याकाळी ६.१८ वाजता सुरू होत आहे, जी ९ मे २०२३ रोजी संध्याकाळी ४.०३ वाजता संपेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते. त्यामुळे ८ मे रोजीच संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाणार आहे.

iहेही वाचा – हातावर ‘ही’ खूण असणाऱ्यांचे पार्टनर ठरतात खूप लकी? तुमच्या हातावरील या रेषा जुळतात का?

ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला शुभ योग

अभिजीत मुहूर्त – सकाळी ११.५१ ते दुपारी १२.४५ पर्यंत
शिवयोग – ९ मे रोजी पहाटे २.५२ ते १२.०९ पर्यंत
ज्येष्ठ नक्षत्र -८ मे रोजी सूर्योदयापासून रात्री ७.१९ पर्यंत

तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ:

मुंबई, महाराष्ट्र: रात्री ०९.५६ वाजता

पुणे, महाराष्ट्र: रात्री ०९.५१ वाजता

नागपूर, महाराष्ट्र: रात्री ०९.३५ वाजता

नवी दिल्ली : रात्री १०:०४ वाजता

जयपूर, राजस्थान: रात्री १०:०५ वाजता

अहमदाबाद, गुजरात: रात्री १०.०८ वाजता

पाटणा, बिहार: रात्री ०९.२२ वाजता

बंगळुरू, कर्नाटक: रात्री ०९.२२वाजता

रायपूर, छत्तीसगड: रात्री ०९.२५वाजता

हैदराबाद, तेलंगणा: रात्री ०९.२९वाजता

चेन्नई, तामिळनाडू: रात्री ०९.११वाजता

कोलकाता, पश्चिम बंगाल: रात्री ०९.०० वाजता

लखनऊ, उत्तर प्रदेश: रात्री ०९.४३ वाजता

चंदीगड: रात्री १०.१२ वाजता

भुवनेश्वर, ओडिशा: रात्री ०९.०५ वाजता

शिमला, हिमाचल प्रदेश: रात्री १०.११ वाजता

डेहराडून, उत्तराखंड: रात्री १०:०५ वाजता

रांची, झारखंड: रात्री ०९.१५ वाजता

हेही वाचा : संकष्टी चतुर्थीला शनीदेव तुम्हालाही करू शकतात कोट्याधीश; ‘या’ राशींना लाभू शकते गणपतीचे वरदान

ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी २०२३ पूजा विधी

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान इ. करून घ्या. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून श्रीगणेशाचे ध्यान करून व्रताचा संकल्प करावा. यानंतर गणेशाची पूजा करावी. सर्वप्रथम देवाला फुलांद्वारे जल अर्पण करावे. यानंतर फुले, हार, दुर्वा, सिंदूर, अक्षता, नैवेद्य इ. अर्पण करावे. यानंतर तुमच्या आवडीनुसार मोदक, बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. यानंतर पाणी अर्पण करावे. नंतर तुपाचा दिवा व उदबत्ती लावून कथेसह मंत्रोच्चार इ. करावे. शेवटी विधिवत आरती करावी. दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी अर्घ्य देऊन चंद्राची पूजा करावी. यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankashti chaturthi may 2023 date time shubh muhurat puja vidhi signification mantra jyestha snk
First published on: 06-05-2023 at 17:30 IST