11th April 2024 Panchang & Horoscope: ११ एप्रिल २०२४ ला आज चैत्र शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असणार आहे. आजच्या दिवशी पंचांगानुसार गौरी तृतीया (तीज) असणार आहे. आज मत्स्य जयंती सुद्धा असणार आहे. दिनविशेष पाहिल्यास आज रमजान ईद व महात्मा फुले जयंती आहे. आज गुरुवारी द्रिक पंचांगानुसार रोहिणी व कृतिका नक्षत्रात, आयुष्यमान व सौभाग्य योग जुळून येणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या राशीला नेमकी कोणत्या रुपात लक्ष्मीची कृती लाभू शकतो हे पाहूया..

११ एप्रिल पंचांग व राशी भविष्य

मेष:-अति विचार करणे टाळावे लागेल. कामाचा बोजा वाढल्याने थकवा जाणवेल. आवडीच्या गोष्टी खरेदी कराल. आपली संगत तपासून पहावी. वाचनातून रहस्यमय गोष्टींची आवड पूर्ण कराल.

Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : फक्त ३ दिवसानंतर या राशींचे बदलणार नशीब, शुक्र गोचरमुळे मिळणार अपार पैसा अन् धन
ketu nakshatra parivartan 2024
१० नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशी कमावणार नुसता पैसा; केतूचे नक्षत्र परिवर्तन २०२५ पर्यंत करणार मालामाल
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Budh Nakshatra Gochar 2024
Budh Nakshatra Gochar 2024 : बुध ग्रहाच्या नक्षत्र गोचरमुळे चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
lucky rashi
गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे मालामाल होतील मिथुन, सिंहसह या पाच राशी, जाणून घ्या साप्ताहिक भाग्यशाली राशी

वृषभ:-कामात चिकाटी ठेवावी लागेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. व्यापार्‍यांना चांगला लाभ मिळेल. आर्थिक गणिते मनाजोगी पूर्ण होतील. तरुण वर्गाचे मत विचारात घ्याल.

मिथुन:-मनातील आकांक्षा पूर्ण होतील. कमिशनमधून चांगला लाभ होईल. छुप्या शत्रूंचा त्रास जाणवेल. मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

कर्क:-अधिकारी व्यक्तींचा सल्ला मिळेल. थोर व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या बोलण्याची उत्तम छाप पडेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.

सिंह:-वडीलधार्‍यांचा योग्य मान ठेवाल. मनातील अकारण आलेली भीती काढून टाकावी. लहान-सहान गोष्टींनी नाराज होऊ नका. अति विचाराने मानसिक तान येऊ शकतो. छंदासाठी वेळ द्यावा.

कन्या:-भागीदाराशी सलोखा वाढेल. नवीन व्यावसायिक धोरण ठरवाल. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा होतील. सहकुटुंब जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

तूळ:-जोडीदाराची आवक वाढेल. कौटुंबिक शांतता जपावी. काही कामे कमी कष्टात पार पडतील. अपचनाचा त्रास जाणवेल. कफ विकारांपासून काळजी घ्यावी.

वृश्चिक:-जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. खर्चाचा आकडा वाढू शकतो. पत्नीच्या सहवासात रमून जाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. व्यावसायिक पाऊले जपून उचलावीत.

धनू:-घरातील वातावरण खेळकर राहील. कामे आनंदात पार पडतील. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत. दिवसभर कामात गुंतून राहाल.

मकर:-आततायीपणे कोणतेही काम करू नका. जवळचा प्रवास घडेल. भावंडांची मदत घ्यावी लागेल. शांत व संयमी विचार करावा. हातून चांगले लिखाण होईल.

कुंभ:-सामाजिक बांधीलकी जपाल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. आवडी बाबत आग्रही राहाल. बोलण्यातून सर्वांचे मन जिंकून घ्याल. बाग-बगीच्याच्या कामात मन गुंतवाल.

हे ही वाचा<< Personality Traits : कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

मीन:-सर्वांशी लाडिकपणे बोलाल. आपले कर्तव्य उत्तम पार पाडाल. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मैत्रीचे संबंध जपावेत.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर