Sankashti Ganesh Chaturthi 2024: हिंदू कॅलेंडरनुसार, एकादशीप्रमाणे, एका वर्षात एकूण २४ गणेश चतुर्थी येतात. या आधारे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षात प्रत्येकी एक चतुर्थी असते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. तसेच फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी गणेश चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी गणपतीची यथासांग पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी श्रीगणेशाची आराधना केल्याने धनसंपत्ती वाढते आणि अपत्यप्राप्ती होते, अशी एक भावना असते. यावेळी संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. जाणून घ्या संकष्टी चतुर्थीतील शुभ योग, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ
संकष्टी चतुर्थी २०२४ शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २८ फेब्रुवारीला पहाटे १:५३ वाजता सुरू होत असून २९ फेब्रुवारीला पहाटे ४:१८ वाजता समाप्त होते.
संकष्टी चतुर्थी २०२४ शुभ योग
हिंदू कॅलेंडरनुसार, संकष्टी चतुर्थीला वृद्धी योगासह सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. हा योग सकाळी ६.५३ वाजता सुरू होत आहे.
संकष्टी चतुर्थी २०२४ चंद्रोदय वेळ
रात्री ०९.२५ वाजता
संकष्टी चतुर्थीनिमित्त करु शकता ‘या’ गणेश मंत्रांचा जप
ॐ गं गणपतये नमः
ॐ गणाधिपाय नमः
ॐ उमापुत्राय नमः
ॐ विघ्ननाशनाय नमः
ॐ विनायकाय नमः
ॐ इशपुत्राय नमः
ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः
ॐ एकादंताय नमः
ॐ इभवक्त्रय नमः
ॐ मुष्कवाहनाय नमः
ॐ कुमारगुर्वे नमः