Saphala Ekadashi Shubh Yog: प्रत्येक एकादशीचं खास महत्त्व असतं. २०२४ वर्ष सुरु झाल्यानंतर जी पहिली एकादशी येते आहे ती पौष महिन्यातील कृष्ण पक्षामधील एकादशी आहे. सफला एकादशी ही नवीन वर्ष २०२४ ची पहिली एकादशी आहे. आज रविवार, ७ जानेवारी २०२४ रोजी पौष महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशीचं व्रत केलं जातं. वर्षभरात एकूण २४ एकदाशी येतात. ज्योतिष शास्त्रानुसार, या एकादशीला शुभ योग जुळून येत आहे. बुध ग्रह धनु राशीत मार्गी होणार आहेत. त्यामुळे काही राशींचे आजपासून शुभदिवस सुरु होण्याची शक्यता आहे. भगवान विष्णूच्या कृपादृष्टीने धनसमृद्धी वाढण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या राशी…

‘या’ राशींचे आजपासून अच्छे दिन?

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी सफला एकादशी खूप खास ठरु शकते. या दिवशी होत असलेल्या बुधदेवाच्या राशीपरिवर्तनामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. तुमची सर्व रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : फेब्रुवारीमध्ये ‘या’ राशींना मिळेल चांगला पैसा? शनि-बुध युती बनल्याने वर्षभरात होऊ शकता प्रचंड श्रीमंत )

धनु राशी

आज सफला एकादशीपासून धनु राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होण्याची शक्यता आहे. बुधदेवाचे धनु राशीत प्रवेश होत असल्याने या राशींच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो. व्यापारी वर्गाला मोठा फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतो. गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यात यशस्वी होऊ शकता. या काळात रिअल इस्टेटमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. या काळात धन आणि संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी

बुधदेवाचे धनु राशीत प्रवेश आणि सफला एकादशी कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गासाठी हा सर्वात उत्तम काळ ठरु शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुम्ही यावेळी काही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. धार्मिक कार्यात रुची वाढेल. समाजातही तुम्हाला सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)