वैदिक पंचागानुसार यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी ६ आणि ७ सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. कारण अष्टमी तिथी ६ आणि ७ तारखेला येत आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रावर झाला होता. त्यामुळे दोन्ही दिवशी जन्माष्टमी साजरी करता येते. मात्र यावेळी ३० वर्षांनंतर जन्माष्टमीला विशेष शुभ मुहूर्त असणार आहे, कारण या वर्षी सर्वार्थ सिद्धी योग, चंद्र वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात तयार होत आहे. तसेच, शनिदेव ३० वर्षांनंतर कुंभ राशीत गोचर करत आहेत. त्यामुळे ३ राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तर या ३ राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

मकर रास (Makar Zodiac)

कृष्ण जन्माष्टमी मकर राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून धन स्थानी गोचर करत आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तसेच, तुम्हाला कठोर परिश्रम करून लाभ मिळल ज्यामुळे तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिकांना त्यांचे अडकले पैसे मिळू शकतात. नोकरदारांना या काळात पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते.

सिंह रास (Leo Zodiac)

तीस वर्षांनंतर विशेष योग तयार होणं सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्र शुभ ठरू शकते. यावेळी तुमच्या उपजीविकेच्या साधनांमध्ये वाढ होऊ शकते. तसेच यावेळी तुमचे उत्पन्नही वाढू शकते. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून सहकार्य मिळू शकते. तुम्हाला नशिबाचीही साथ मिळाल्यामुळे तुमची प्रलंबित कामे तेथे पूर्ण होऊ शकतात. काही ठोस निर्णय घ्याल जे यशस्वी ठरु शकतात. यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामातून लाभ मिळू शकतो.

हेही वाचा- सप्टेंबरमध्ये गुरु, सूर्यासह ३ ग्रहांच्या चालीत होणार मोठे बदल, ‘या’ राशींचे सुरू होणार अच्छे दिन? व्यवसायात प्रगतीची शक्यता

वृषभ रास (Taurus Zodiac)

जन्माष्टमी तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. याशिवाय तुमच्या आयुष्यात पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तुमचे उत्पन्न वाढू शकते. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तारही करू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)