10th february Horoscope Marathi : आज १० फेब्रुवारी, शनिवार, माघ मासारंभ : काही राशींना आज जोडीदाराची उत्तम साथ लाभणर आहे. काहींना कौटुंबिक आणि वैवाहिक सौख्य लाभेल. आज तुमच्या राशीचे ग्रहमान कसे राहील पाहा.

मेष:-धार्मिक कामात हातभार लावाल. सेवेचे महत्व जाणून वागाल. परदेशगमनाचा योग येईल. आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांची गाठ पडेल. सामाजिक सेवेत काम कराल.

वृषभ:-जोडीदाराशी मतभेद संभवतात. मानसिक स्थैर्य जपावे. जुन्या कामातून लाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामात लक्ष घालावे लागेल. रेस, जुगार यांपासुन दूर राहावे.

मिथुन:-उत्कृष्ट वैवाहिक सौख्य लाभेल. उगाचच मतभिन्नता दाखवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वातविकाराचा त्रास जाणवेल. फार तिखट पदार्थ खाऊ नयेत.

हेही वाचा : Shani dev : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वी शनि बदलणार चाल, या राशीच्या लोकांचा होऊ शकतो ब्रेकअप?

कर्क:-मानसिक शांतता जपावी. क्षुल्लक कटकटी नजरेआड कराव्यात. आत्मविश्वास बाळगावा लागेल. कफ विकार जाणवतील. तुमची चिडचिड वाढू शकते.

सिंह:-शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. अंत:स्फूर्तीने कामे कराल. सूचक स्वप्ने पडतील. जुगाराची आवड दाखवाल. काहीसे स्वछंदीपणे वागाल.

कन्या:-उत्तम गृहसौख्य लाभेल. घरात थोर व्यक्तींची ऊठबस राहील. भावंडांची बाजू जाणून घ्या. चांगले वाहन सौख्य लाभेल. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल.

तूळ:-मानसिक चंचलता जाणवेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. मानसिक संवेदना दाखवाल. सर्वांशी प्रेमळपणे वागणे ठेवाल. नवीन गोष्टी जाणून घ्याल.

वृश्चिक:-कौटुंबिक कार्यक्रम आखले जातील. अडथळ्यातून मार्ग काढाल. मेहनतीला मागे हटू नका. कामात उतावीळपणा करू नका. हट्टीपणे वागणे राहील.

धनू:-आपल्या मनाप्रमाणे वागाल. वैचारिक प्रौढता दाखवाल. सामाजिक जाणि‍वेतून कामे कराल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. गैरसमजुतीला बाजूला ठेवा.

हेही वाचा : Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर चाणक्यांचे ‘हे’ शब्द तुमच्याकडे नोट करुन ठेवा; नेहमी राहाल पुढे

मकर:-कामात क्षुल्लक कारणाने दिरंगाई होईल. पारमार्थिक उन्नती साधता येईल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. बौद्धिक दिमाख दाखवाल. कामात चलाखी दाखवाल.

कुंभ:-सुसंस्कृत लोकांच्यात वावराल. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण होतील. अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. काटकसरीने वागाल. अधिकारी व्यक्तींच्या ओळखी होतील.

मीन:-कामाची धांदल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका. अधिकारी व्यक्तींची मदत मिळेल. प्रवासात सावधानता बाळगावी. तुमचा मान वाढेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर