Navpancham Rajyog 2025 Impact in Marathi: शनिदेवाला कर्मांचा देव किंवा कर्मफल देणारा म्हटले जाते. ते प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसारच फळ देतात. शनी हा एकमेव असा ग्रह आहे जो अत्यंत मंदगतीने चालतो आणि त्याचं स्थान किंवा युती कोणत्याही राशीवर मोठा प्रभाव टाकते. सध्या शनी मीन राशीत विराजमान आहेत आणि येत्या २८ जून रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी बुध आणि शनी यांच्यात १२० अंशाचं ‘नवपंचम राजयोग’ तयार होणार आहे. ही युती म्हणजे एक अद्भुत योग ज्यामुळे काही निवडक राशींवर सुख, समृद्धी, मान-सन्मान, नवी नोकरी आणि धनलाभाचा वर्षाव होणार आहे. कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी पाहूयात…
शनी-बुध नवपंचम योगाचा जबरदस्त प्रभाव! ‘या’ राशींना लाभतील नवी संधी, यश आणि संपत्ती!
वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग अनेक संधी घेऊन येणार ठरु शकतो. कामाच्या ठिकाणी यश, शत्रूंवर विजय, उत्पन्नात वाढ आणि अनपेक्षित प्रवासातून लाभ होऊ शकतो. तुम्हाला गुंतवणूक, व्यवसाय किंवा मालमत्तेशी संबंधित चांगल्या संधी मिळू शकतात. बेरोजगारांना सरकारी नोकरी मिळू शकते. संतानसुख मिळेल, घरात सुख-शांती नांदेल आणि आरोग्य उत्तम राहील. पदोन्नतीची शक्यता आहे, तसेच दीर्घकाळ अडकलेली कामं या काळात पूर्ण होऊ शकतात.
तूळ (Libra)
तूळ राशीसाठी हा राजयोग भाग्याचा दरवाजा उघडणारा ठरु शकतो. विरोधकांवर मात करता येईल, कामात प्रगती होऊ शकते. प्रॉपर्टी व्यवहार, सरकारी कामं, स्पर्धा परीक्षा यामध्ये यश मिळू शकतं. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. व्यवसायात विस्ताराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. समाजात मान-सन्मानात वाढ होऊ शकते. जर तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काम करत असाल तर तुम्हाला यावेळी सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीसाठी शनीची साडेसाती अखेरच्या टप्प्यावर आहे आणि आता लाभदायक स्थिती निर्माण होत आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. विदेशसंबंधित कामांमध्ये यश, घरगुती तणावांपासून मुक्ती, मालमत्तेचा लाभ, आणि मानसिक शांती लाभू शकते. या काळात मोठा धनलाभ होऊ शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)